समुद्रावर स्वारी

'अनंत अमुचि ध्येयासक्ती किनारा, तुला पामराला' अशी ओळ कवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेत लिहिली आहे. त्यात कवी समुद्राला उद्देशून म्हणतो की माणसाची ध्येयासक्ती इतकी मोठी आहे की समुद्राचा अफाट विस्तार तिला रोखू शकत नाही. समुद्र जरी विस्तीर्ण असला तरी देखील त्याला किनारा आहे. पण माणसाच्या इच्छाशक्तीला किनारा नाही. समुद्रावर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तीन वेगवेगळ्या राजांची माहिती यासंदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) यातील पहिले राजे म्हणजे प्रभू श्री राम! रावणाने कपट करून सीतामाईचे हरण केले. सुग्रीवाच्या मदतीने, हनुमंतांची योजना झाली . त्यातून सीतामाई लंकेत आहे हे समजले. प्रभू श्रीरामांनी लंकेवर स्वारी करण्याचे ठरवले. श्रीराम , लक्ष्मण यांच्याबरोबर प्रचंड मोठ्या संख्येने वानर सैन्य चालू लागले. शेवटी ते समुद्र किनाऱ्यावर पोचले. लंका हे समुद्रातील बेट असल्यामुळे समुद्राने वाट दिली तर पुढे जाता येणार होते. श्रीरामांनी तीन दिवस समुद्राची विनवण केली. परंतु समुद...