Posts

Showing posts with the label १५ ऑगस्ट

भारताच्या विभाजनाचा इतिहास

Image
२०फेब्रुवारी  ते १७ ऑगस्ट १९४७(होय होय १७ ऑगस्ट १९४७च) ह्या छोट्याश्या काळात ज्या वेगाने घटना घडल्या त्याने एक दुःखदायक, रक्तरंजित,वेदनादायक असा इतिहास लिहिला गेला.या कालावधीत कोट्यवधी लोक निर्वासित झाले, लाखो निरपराध प्राणाला मुकले तर हजारो महिलांच्यावर अमानुष अत्याचार झाले. या काळातील ठळक घडामोडी २० फेब्रुवारी १९४७ :-"आम्ही जून १९४८ (होय जून १९४८च) पर्यंत भारतात सत्तांतर करू."  क्लेमेंट ॲटली  सरकारची ब्रिटीश पार्लमेंटमध्ये घोषणा,३ जून १९४७ :- भारताच्या फाळणीची व्हॉईसरॉय माउंटबॅटनची घोषणा,१४ ऑगस्ट १९४७:- पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन, १५ ऑगस्ट १९४७ :- भारताचा स्वातंत्र्यदिन , १७ ऑगस्ट १९४७ :- भारत,पाकिस्तानच्या सीमा ठरवण्यासाठी नेमलेल्या रॅडक्लिफ आयोगाने सीमा जाहीर केल्या. विचार करायला लावणाऱ्या गोष्टी:- जून १९४८ ची मुदत असताना हे स्वातंत्र्य ऑगस्ट १९४७ मध्ये आणि १५ ऑगस्टलाच का तर जपानी सैन्याने१५ ऑगस्ट १९४५ ला युद्धात  माउंटबॅटनपुढे शरणागती पत्करली होती.  पाकिस्तान कदापी निर्माण होणार नाही असे म्हणणाऱ्या नेत्यांचे शब्द खोटे का ठरले?  सीमा आयोगाचा निर्णय देखी...