Posts

Showing posts with the label ऐनापुरे बाई

साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग ( भाग ७)

Image
  वि.गो.ऐनापुरेसर आणि सु.वि.ऐनापुरेबाई आमच्या शाळेतील शिक्षक मला वेगवेगळ्या कारणांनी लक्षात राहिले आहेत.तसही शालेय विद्यार्थ्याचं भावविश्व शाळेशी खूपच बांधलं गेलेलं असतं. ऐनापुरे सर माझ्या लक्षात राहिले ते गावातील सर्व स्तरातील लोकांशी असलेल्या त्यांच्या संवादामुळे.सर साखरवाडीतील बाजारपेठेत आले की जवळपास सगळ्या दुकानदारांशी, हातगडीवाल्यांशी,भाजीवाल्यांशी त्यांचं मनमोकळं बोलणं व्हायचं.आणखी एक विशेष म्हणजे ते हॉटेलात आवडीने चहा भजीचा आस्वाद घेताना दिसायचे. विद्यार्थ्यांनी मनापासून शिकलं पाहिजे अशी त्यांची तळमळ असायची.मला चांगलं आठवतंय आम्ही ७ वीत असताना शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी शिक्षक वसाहतीत त्यांच्या घरी जादा तासांना जायचो. आमच्या वर्गात असणारा कै.(कै. लिहिताना जिवावर येतंय) सुनील माडकर (त्याच्याबद्दल परत कधीतरी) जवळपास महिना दीड महिना त्यांच्याकडे आला नव्हता.त्यामुळे पुन्हा आला त्यादिवशी त्याला सरांनी चांगलच मारलं.तसं शाळेतही सर मुलांवर चिडायचे, तारस्वरात ओरडायचे, मुलांना मारायचे देखील.गोरेपान असणारे सर रागाने बेभान आणि लालेलाल व्हायचे.त्यांचं तारस्वरातलं बोलणं आजूबाजूच्या वर्गा...