अटळ ते होणार
अनेक वेळा माणूस एखादी योजना करतो आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष घडेल असे मानत राहतो. बऱ्याच वेळा याप्रमाणे होते परंतु काही वेळा वेगळेच घडून जाते. नंतर मग हे इलाजाने किंवा नाईलाजाने मान्य करावे लागते की अटळ ते होणार. हिंदू विचाराप्रमाणे ब्रह्मदेव विश्व घडवतो म्हणून असे म्हटले जाते, 'होणारे न चुके कधीही जरी ये ब्रह्मा तया आडवा'. प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य यांच्या आयुष्यातील एक कथा सांगितली जाते. भास्कराचार्यांचा फलज्योतिष्याचादेखील अभ्यास होता. त्यांनी आपली मुलगी लीलावती हिची पत्रिका बघून तिला विवाहानंतर वैधव्य येणार आहे हे जाणले होते. तिच्या आयुष्यामध्ये एकच असा मुहूर्त होता की ज्या मुहूर्तावर तिचे लग्न झाले असते तर वैधव्य टळणार होते. भास्कराचार्य यांनी सर्व काटेकोर तयारी केली. परंतु वेळ दाखविणाऱ्या घटिका पात्रात तांदळाचा कण अडकल्यामुळे मुहूर्त साधला गेला नाही. दुसऱ्या वेळेवर लग्न लागल्याने लीलावती हिला वैधव्य आले. पुढे भास्कराचार्यांनी तिला गणित शिकवण्यासाठी ग्रंथ रचना केली ती प्रसिद्ध आहे. मी...