Posts

Showing posts with the label सर परशुरामभाऊ महाविद्यालय

खान्देशी शब्द - अहिराणी भाषा

" मऽग" समोरचा माणूस मोठ्यानं म्हणायचा. मला सुरुवातीला लक्षात यायचं नाही की "जेवण झालं का?" या साध्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं न येता 'मग' असं का मिळतं. १९८८-१९९० दोन वर्षे पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या वसतिगृहात आमच्याबरोबर काही खानदेशी विद्यार्थी होते. त्यांची अहिराणी भाषा त्यावेळेला बरीचशी समजायची नाही. त्यावेळेला मला हे माहीत नव्हतं की भविष्यात खान्देशात राहूनच ही भाषा मला थोडीफार शिकता येणार आहे. मराठवाड्यानंतर संघाच्या कामासाठी दोन वर्षे खानदेशात धुळे जिल्ह्यात (जूून१९९९- जून२००१) राहण्याचा योग मला आला. या काळात अहिराणी भाषा सतत कानावर पडायची आणि मीदेखील ती शिकण्याचा प्रयत्न करीत असे. त्यामुळे अहिराणी मला बऱ्यापैकी समजू लागली होती. काही वाक्यंंदेखील मी बोलू लागलो होतो. धुळ्यात सुरुवातीला गेल्यावर सुरूवातीला काही दिवस 'मग' म्हणजे 'होय' हे मला लक्षात येत नसे. काही दिवसांनी मला ते समजू लागले. त्यामुळे "जेवण झालं का?" या प्रश्नाला उत्तर "मऽग" असे आले याचा अर्थ "होय, जेवण झाले" हे मला समजू ...