Posts

Showing posts with the label शिंदे

पुस्तक परिचय :- शहामतपनाह बाजीराव

Image
  लेखक :- कौस्तुभ कस्तुरे राफ्टर पब्लिकेशन्स मुंबई शहामतपनाह या शब्दाचा अर्थ शौर्य गाजवणारा किंवा शौर्यस्थान असा होतो. थोरले बाजीराव यांचा मोठा शत्रू निजाम उल मुल्कने या शब्दाने त्यांचे वर्णन केले आहे. या पुस्तकात आपल्याला प्रामुख्याने बाजीरावांनी केलेल्या लढायांचे वर्णन ऐतिहासिक संदर्भासह वाचायला मिळते. बाजीरावांच्या पराक्रमी कारकीर्दीतील महत्वाचे प्रसंग असे आहेत. फेब्रुवारी १७२८ मध्ये वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी पालखेड येथे निजाम उल मुल्क याच्यावर मोठा विजय मिळवला. अतिशय चपळाईने वेगाने हालचाल करून निजामाला कोंडीत पकडले होते. माळवा या प्रांतामध्ये विजय प्राप्त करत असताना स्वत:च्या सरदारांवर ठेवलेला विश्वास दिसून येतो. स्वतःचे विशेष शिक्के राणोजी शिंदेेंना वापरायला दिले. वेळ प्रसंगी मल्हारराव होळकर यांना ते शिक्के वापरण्याची परवानगी दिली होती. माळव्यात प्रत्यक्ष नियंत्रण ठेवता येणार नाही हेेे लक्षात घेऊन मुत्सद्दीपणे होळकर, शिंदे, पवार ,बुळे, बुंदेले यासारख्या सरदारांकडे राज्यकारभार वाटून दिला. या सगळ्यातून बाजीरावांचे विकेंद्रीकरणाचे धोरण लक्षात येते. निजाम उल् मुल्क याची सातार...