Posts

Showing posts with the label स्पर्धा

वसतिगृहात नव्याने रहायला लागल्यावर..

"सर, आमची प्रणिता( नाव बदललं आहे.) अकरावीला नापास झाली.एवढी हुशार मुलगी नापास कशी झाली"...पालक " मी आता माझ्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमात आहे. नंतर बोलूया."... मी १४ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग माझ्या लक्षात राहिला आहे. वसतिगृहात दरवर्षी मोठ्या संख्येने मुलेमुली ११ वी, महाविद्यालयाचे प्रथम वर्ष यासाठी प्रवेश घेतात. ११ वी चं वय तर अधलंमधल , पौगंडास्थेतील असत. छोट्या गावातून ,शहरातून आलेल्या अनेक मुलांवर पुण्यासारख्या मोठ्या शहराचे दडपण येतं. महाविद्यालयातील शिकवण्याची पद्धत वेगळी असते. मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलामुलींना इंग्रजी भाषेचे दडपण जाणवत असते. गेल्या काही वर्षांत ज्यांनी खाजगी शिकवणी वर्ग प्रवेश घेतला आहे अशा बहुतेकांचे शिकवणी वर्गाला तिथल्या अभ्यासाला जास्त प्राधान्य असतं. आणि महत्त्वाचे म्हणजे घर सोडून पहिल्यांदाच बाहेर राहणाऱ्यांना घरची सारखी आठवण येत असते. अशाच आणखी काही चिंता असतात. मी दहावी उत्तीर्ण झाल्यावर पुण्यात सर परशुराम महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि वसतिगृहात राहायला आलो. पहिले दीड दोन महिने मला रोज पाचच्या सुमारास असं वाटायचं की ...