अजुनि रुसूनि आहे मतदार!
कवी अनिल यांनी लिहिलेले आणि कुमार गंधर्व यांनी संगीत देऊन स्वतः गायलेले एक गीत आहे , ' अजुनि रूसूनि आहे,खुलता कळी खुलेना.' या गीताचा संदर्भ, विषय आणि आशय एका प्रियकराचा, पतीचा आपल्या प्रेयसीच्या, पत्नीच्या रूसव्याबाबतचा आहे. कवी अनिल म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे यांच्या पत्नी कुसुमावती यांच्या निधनानंतर ही कविता त्यांनी लिहिली आणि नंतर त्याचे गीत झाले. यूट्यूबवर ते ऐकता येईल. या लेखातील विषयाचा विचार करताना त्या गीताचे पहिले काही शब्द मला या विषयासाठी योग्य वाटले म्हणून ते शीर्षकात वापरले आहेत. पण गीताचा विषय आणि लेखाचा विषय अतिशय वेगवेगळे आहेत. सध्या भारतात लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. हा लेख प्रसिद्ध होत असताना निवडणुकीच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व मतदार संघातील मतदान संपले आहे. देशपातळीवर लक्षात घेतले तर साधारण ३८ % ते ८० % असे मतदान झाले आहे. महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी साधारण ५० % ते ६८% पर्यंत आहे. ( पुण्यात लावलेला...