Posts

Showing posts with the label श्रीराम

सामाजिक समरसतेसाठी आचरणात आणण्याच्या गोष्टी

Image
          कै. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या 'आरंभी वंदिन अयोध्येचा राजा' या गीतामध्ये उल्लेख असा आहे की: 'घेता रामनाम होय पापक्षय, पुण्याचा संचय पुण्यक्षेत्री.' मी विचार करत होतो की वैयक्तिक आयुष्यात तर कमी-अधिक प्रमाणात काही चुका आपल्या हातून घडतात,  कोणाच्या हातून पाप देखील घडतं. पण समाज म्हणून आमच्या हातून काही पाप घडलंय का हो? तर विचार करताना माझ्या मनात लक्षात असं आलं की होय, आपण हे मनापासून मान्य केलं पाहिजे की समाज म्हणून आमच्याकडून पाप घडलेलं आहे. आणि ते एक-दोन दिवस नाही, एक-दोन वर्ष नाही, १००-२०० वर्ष नाही, जवळपास हजार-दोन हजार वर्ष आम्ही या देशामध्ये ते पाप करत गेलो. कोणी केलं, का केलं, त्याला जबाबदार कोण, हा सगळा विषय आपण चर्चेचा म्हणून अभ्यासकांच्यावर, विद्वानांच्यावर सोडून देऊयात. परंतु हो, आम्ही हे पाप केलंय हे आपण पहिल्यांदा मनामध्ये समजून घेऊया. ते पाप असं केलंय की 'आम्ही माणसाला माणूस म्हणून म्हणण्याचं नाकारलं'. दुर्दैवानं ते आमच्या पूर्वजांच्या हातून घडलं.                  ( छायाचित्र कृत्रिम बुद्...

समुद्रावर स्वारी

Image
     'अनंत अमुचि ध्येयासक्ती किनारा, तुला पामराला' अशी ओळ कवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेत लिहिली आहे. त्यात कवी समुद्राला उद्देशून म्हणतो की माणसाची ध्येयासक्ती इतकी मोठी आहे की समुद्राचा अफाट विस्तार तिला रोखू शकत नाही. समुद्र जरी विस्तीर्ण असला तरी देखील त्याला किनारा आहे. पण माणसाच्या इच्छाशक्तीला किनारा नाही. समुद्रावर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तीन वेगवेगळ्या राजांची माहिती यासंदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे.         ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )      यातील पहिले राजे म्हणजे प्रभू श्री राम! रावणाने कपट करून सीतामाईचे हरण केले. सुग्रीवाच्या मदतीने, हनुमंतांची योजना झाली . त्यातून सीतामाई लंकेत आहे हे समजले. प्रभू श्रीरामांनी लंकेवर स्वारी करण्याचे ठरवले. श्रीराम , लक्ष्मण यांच्याबरोबर प्रचंड मोठ्या संख्येने वानर सैन्य चालू लागले. शेवटी ते समुद्र किनाऱ्यावर पोचले. लंका हे समुद्रातील बेट असल्यामुळे समुद्राने वाट दिली तर पुढे जाता येणार होते. श्रीरामांनी तीन दिवस समुद्राची विनवण केली. परंतु समुद...

हिंदूं समाजाच्या भाव जागरणाचा स्पृहणीय प्रयत्न

Image
       अंधारलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर दिवे उजळले. जवळपास हजार डोळे समोर खिळले आणि सुस्वरात आरती सुरू झाली.  नमोस्तुते जय देवी सुर सरिते गोदावरी माता | कैसै हो वर्णित शब्दों मे तव गाथा ||  ( छायाचित्र कु. सिद्धांत उपासे )          मानवी जीवनाचा प्रवाह हजारो शतक वर्षांपासून या भारत भूमीमध्ये अखंडित वाहत आलेला आहे. या भारतभूमीविषयी ज्यांची भक्ती आहे असा हिंदू समाज आपल्या परंपरेचे पालन आजदेखील करत आलेला आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी बुद्धी आणि भावना यांचा प्रभाव दिसतो. बऱ्याच वेळा असे दिसते की या दोघींपैकी कोण वरचढ ठरणार त्यावर निर्णय होतो. साधारणपणे उचंबळून आलेल्या भावना माणसाला विलक्षण गोष्टी करायला भाग पाडतात. अनेक वेळा अशा गोष्टी माणसाचे आयुष्य वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. त्यामुळे या भावनांची जोपासना करणे, त्यांचे जागरण करणे आणि त्यांना योग्य दिशेने प्रवाहित करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. हिंदू संस्कृती हजारो वर्षांची असल्याने अनेक प्रथा परंपरा काळाच्या ओघात उदयाला आल्या. त्यापैकी काही स्थिर झाल्या तर काही काळाच्या प्रवाहात ...

श्रीराम : विद्यार्थ्यांचा आदर्श

Image
      केवळ भारतातच नव्हे तर जगभर पसरलेला हिंदू समाज तसेच अनेक देशावरील कोट्यवधी नागरिक श्रीरामांना आदर्श मानतात. माणूस म्हणून जन्माला येऊन देवत्व प्राप्त करणाऱ्या श्रीरामंचे चरित्र सर्वांना सर्वकाळासाठी आदर्श आहे. यात विद्यार्थ्यांनादेखील ते आदर्श आहे. या लेखात विद्यार्थी श्रीरामांच्या कोणत्या गुणांचे अनुसरण करू शकतात हे आपण पाहूया.     ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)        अयोध्यचे महाराज दथरथ आणि त्यांची पत्नी कौसल्या यांच्या पोटी जन्माला आलेले श्रीराम बालवयातच सर्वांना प्रिय झाले होते. तसेच त्यांच्या क्षमतांची प्रसिद्धीदेखील दूरवर पसरलेली होती. श्रीराम बारा वर्षांचे झाले असता एके दिवशी महाराज दशरथांच्या दरबारात महर्षी विश्वामित्र यांचे आगमन झाले. पूर्वायुष्यात स्वतः राजे असलेले विश्वामित्र तपश्चर्या करून ब्रम्हर्षी पदाला पोचले होते. त्यामुळे शस्त्र धारण करणे, युद्ध करणे हे त्यांनी सोडून दिले होते. ईश्वराचे अनुष्ठान करण्यासाठी ते यज्ञयाग करत असत. परंतु त्यांच्या आश्रमाच्या प्रदेशात दुष्ट राक्षसांनी थैमान घातले होते. हे राक्षस यज्ञकुंडात मां...

गुणसागर श्रीराम

Image
  आध्यात्मिकता हा प्राचीन भारताचा मूळ स्वभाव आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या भारतातील व्याख्यानांमध्ये वारंवार याचा उच्चार केला आहे आध्यात्मिकतेचा हा प्रवाह नेमका किती वर्षांपासून वाहतो आहे हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. आध्यात्मिकतेच्या या प्रवाहाची निर्गुण उपासना आणि सगुण उपासना अशी दोन अंगे आहेत. जनसामान्यांना निर्गुण तत्वाची उपासना करणे जड जाते. त्यासाठी आदर्श तत्त्व साकार रूपात त्यांना हवे असते. हा साकार रूपातील आदर्श म्हणजे श्रीराम! म्हणूनच ' रामो विग्रहवान् धर्मः' असे म्हटले जाते. म्हणजे राम हे धर्माचे रूप आहे. भारतभूमीच्या हजारो वर्षांच्या जीवनप्रवाहामध्ये या महामानवाने आपल्या जिवंतपणीच देवत्वाची मान्यता मिळवली असे ते  मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम! सार्वकालिक प्रेरणा देणारे असे श्रीरामांचे चरित्र आहे. या चरित्रातील अनेक गोष्टी सदैव मार्गदर्शक आहेत. 'चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ' हे लक्षार्थाने आणि वाच्यार्थानेही खरे आहे. त्यातील मोजकेच पैलू पाहूया. ( कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून काढलेले चित्र फेसबुक वरून साभार) राम चरित्र वाचताना अनेक मुद्दे लक्षात येतात त्या...