आपली शाळा आपल्याला काय काय शिकवते?
आपली शाळा आपल्याला काय काय शिकवते असा विचार केला की अनेक गोष्टी लक्षात येतात. शाळा आपल्याला शिकवते की कठोर परिश्रम, सततची मेहनत करत राहिलो तरच यशाची नवनवीन शिखरे आपण गाठत राहू. ही यशाची शिखरे गाठत असताना आपल्या मर्यादांची जाणीव ठेवत आपण स्वतःवर विश्वास ठेवू. आधुनिक जगात बाह्य स्पर्धा कितीही वाढली असली किंवा तसे वाटत असले तरी खरी स्पर्धा स्वतःशीच असते. कारण स्वतःच स्वतःला नवनवीन आव्हानांसाठी तयार करायचे असते. हे करत असताना स्वतःची काही तत्वे, मूल्ये निश्चित करत ती सदैव स्वतःकडून पाळली जातील याची काळजी घ्यायची असते.वेळोवेळी या मूल्यांवर ठाम राहण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्यात कोणतीही कुचराई करायची नसते. कोणतेही यश मिळवणे आणि ते खूप काळ टिकवून ठेवणे यासाठी आपल्याला आपल्या स्वतःच्या विश्वासू सोबत्यांची, सहकाऱ्यांची आवश्यकता असते. या सर्व सहकाऱ्यांबरोबर स्वतः एकसंघ भावनेने काम करण्याची आवश्यकता असते. शाळेतील वर्षे ही हसण्याची, खेळण्याची , नवनवीन गोष्टी शिकण्याची आहेत. आपल्या संस्थेच्या शाळेत शिकत असताना संस्थेच्या आणि शाळेच्या प्रदीर्घ इतिहासाची आपल्याला ओळख होते. या वारशाची जाणीव...