आनंद लुटण्याचा प्रकार
आनंद सर्वच प्राणीमात्रांना होतो. पण मानवाचे वेगळेपण असे की त्याला आनंद घेण्याचे विविध प्रकार आणि साधने माहिती आहेत. तसेच मानवाने आपली बुद्धिमत्ता, सृजनशीलता यांच्या आधारावर त्याने आनंदाची नवनवीन साधने निर्माण केली. या सगळ्याचा परिणाम म्हणून माणूस विविध प्रकारे आनंद मिळवू शकतो. आनंद मिळवण्याचे किंवा लुटण्याचे प्रकार वयोमानानुसार बदलत जातात. वय, अनुभव, पार्श्वभूमी यामुळे यात वेगवेगळ्या प्रकारचे स्तर होत जातात. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार) समुद्राचे अथांगपण जवळपास सर्वच माणसांना भावते. समुद्रकिनारी गेल्यावर बहुतेक सगळ्यांनाच समुद्रात डुंबण्याची इच्छा होते. पण अगदी लहान वयातील मूल ज्यावेळी समुद्रकिनारी जाते त्यावेळी ते बावरून जाते. पण पाण्याचे आकर्षण हे असतेच. पाण्याचा आनंद घेण्याची इच्छा त्या मुलाला होते. आईवडील अथवा कोणी नातेवाईक अशा लहान मुलाला घेऊन समुद्राच्या अगदी काठावर उभे राहतात. थोड्याच पाण्यात त्याला नेतात. समुद्राच्या लाटा पायांवर येऊन आदळतात आणि परत जातात. लहान म...