जादूटोणा ?!
जगामध्ये चमत्कार, जादूटोणा यांची खूप चर्चा होत असते. आहेत की नाहीत अशा दोन्ही बाजूंनी भरपूर सांगितले जाते. परंतु जगभर याप्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. जनमानसावर त्याचा विलक्षण पगडा असतो. विशेषतः ऐतिहासिक काळात तर याबाबत बरेच गूढ वातावरण होते. इतके की एका माहितीनुसार युरोपमध्ये चौदावे ते अठरावे शतक या मध्ययुगीन काळात हजारो जणांवर खटले चालवले गेले . त्यातील अनेकांना दोषी ठरवून जिवंत जाळणे, शिरच्छेद किंवा फाशी अशा शिक्षा देण्यात आल्या. भारतातही गौड बंगाल, काळी जादू, जादूटोणा, भानामती या नावांनी अशा गोष्टी प्रचलित आहेत. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) सध्याचे हिंदी भाषेतील आघाडीचे लेखक, चित्रपट कथाकार श्री.अक्षत गुप्ता यांच्या काही मुलाखती नुकत्याच ऐकल्या. त्यामध्ये त्यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगितला. २०१४ पासून त्यांच्या आयुष्यात अनेक उलथापालथी झाल्या. घटस्फोट झाला, चांगला चालत असलेला हॉटेल व्यवसाय नुकसानीत गेला, अपघात झाला,आत्महत्येचाही अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या धाकट्या भावाने यावर त...