Posts

Showing posts with the label मोरोपंत पिंगळे

छ.शिवराय : व्यापाराबाबतची दूरदृष्टी

Image
        मध्ययुगीन काळात शेती व व्यापारावरील कर हेच महसुलाचे मुख्य साधन होते. यासाठी व्यापारी , सावकार यांचे राज्यकर्त्यांना महत्त्व वाटत असे. याबाबत शिवाजी महाराजांचे धोरण काय होते हे काही उदाहरणांवरून लक्षात येते.       ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)      पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी इंग्रजांनी केलेल्या आतताईपणामुळे इंग्रजांचा एकूण दृष्टिकोन, व्यवहार शिवरायांनी चांगलाच ओळखला होता ते ओळखून त्यांच्याशी ते व्यवहार करत होते. याचेच एक विलक्षण उदाहरण आहे. राज्याभिषेकानंतर महाराजांनी इंग्रजांच्याकडून मोठ्या प्रमाणात तांबे विकत घेतले. आता व्यवहार पूर्ण करायचा तर याचे पैसे द्यायला हवेत. परंतु रायगडावर सद्यस्थितीत रोख रक्कम पुरेशी नाही. त्यामुळे तुम्हाला गोवळकोंड्याची हुंडी देतो. ती तेथे जाऊन वटवा आणि पैसे घ्या असे महाराजांनी सांगितले. हुंडी घेऊन इंग्रजांचा माणूस रायगडावरवरून निघाला आणि मुंबईला पोचला. त्या काळात प्रवासाची साधने म्हणजे घोडा , पालखी इत्यादी असल्यामुळे एकूण प्रवासाला खूप वेळ लागत असे. इंग्रजांच्या त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे सर...

छ.शिवराय : स्वामिनिष्ठांचा प्रामाणिकपणा

Image
  छ. शिवाजी महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांनी उभी केलेली स्वामिनिष्ठांची मांदियाळी.‌ स्वराज्याच्या कामासाठी सर्व प्रकारचा त्याग करायला तयार असणारे हजारो लोक त्यांनी उभे केले. यामध्ये " आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे" असे म्हणणारे तानाजी मालुसरे आहेत. " तोफेआधी मरे न बाजी सांगा मृत्यूला" असं म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे आहेत. ' मातेस्तव धडही लढते संग्रामात ' असं ज्यांच्या आवेशाचं वर्णन केलं जातं ते मुरार बाजी देशपांडे आहेत. महाराजांच्या आज्ञेसरशी आखाड्यात उतरून पिसाळलेल्या हत्तीशी झुंज घेऊन त्याला लोळवणारे येसाजी कंक आहेत. अशी कितीतरी नावे सांगता येतील. अशी कणखर मनाची माणसे शिवरायांनी उभी केली. त्यांच्याबद्दल म्हणता येईल की, ' कालगतीहून बलवत्तर ही पौरूषशाली मने, याच मनांच्या अमित बलावर लाख झुंजवू रणे".           ‌( छायाचित्र सौजन्य अपूर्व सुरवसे )     या सगळ्यांचे वैशिष्ट्य असे की त्यांचा पराक्रम, कर्तृत्व ते शिवरायांना सांगायचेच पण प्रसंगी आपल्या चुकादेखील सांगायचे. हा प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वा...