पी.टी.
"आपला पाल्य वसतिगृहातील सक्तीचा व्यायाम करण्यास तयार आहे का?" गेली अनेक वर्षे म.ए.सो.महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रवेश अर्जावर हा प्रश्न लिहिलेला असतो. सर्व विद्यार्थी हो असा पर्याय निवडून प्रवेश घेतात. मग एका नवीन अनुभवाला सामोरे जातात. साधारण २५-२६ वर्षांपूर्वी त्यावेळचे वसतिगृहप्रमुख प्रा.र.वि.कुलकर्णी सरांनी हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम वसतिगृहात सुरू केला. आयुष्याच्या धकाधकीला सामोरे जाण्यासाठी शारीरिक क्षमता प्राप्त करून घेणे अतिशय आवश्यक आहे. या कल्पनेने शारीरिक क्षमता जोपासावी या हेतूने हा उपक्रम सुरू झाला. सकाळी ६ ते ६:३० या वेळात महाविद्यालयाच्या सत्रात अध्यापन सुरू असताना सक्तीच्या व्यायामाचा हा उपक्रम घेतला जातो. याच्या अंमलबजावणीमध्ये मुला-मुलींना सहभागी करून घेतले जाते. मुलांचा आणि मुलींची पी.टी.लीडर यांची निवड केली जाते. त्यांच्यावर पी.टी.घेण्याची जबाबदारी सोपवली जाते. कुलकर्णी सर , उमराणी सर यांच्यासोबत मी आणि आता मी आणि डॉ.विनायक पवार सर मुलांच्या बरोबर मैदानावर असतो. महाविद्यालयाच्या मैदानावर पळत -चालत...