Posts

Showing posts with the label महात्मा बसवेश्वर

महात्मा बसवेश्वर आणि श्रमप्रतिष्ठा

Image
     महात्मा बसवेश्वरांनी मांडलेल्या विचारांमध्ये श्रमप्रतिष्ठा हा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. जगण्यासाठी शारीरिक श्रम करणे आवश्यक आहे असा विचार त्यांनी सांगितले. या श्रमांतून उच्च स्थान प्राप्त होईल असे त्यांनी सांगितले.‌ कन्नड भाषेतील त्यांचे वचन आहे 'कायकवे कैलास'. कायक म्हणजे शारीरिक श्रम. कैलास म्हणजे उच्च स्थान (मोक्ष) !          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        जगभर मानव‌ समुहात राहू लागल्यानंतर हळूहळू समाजात माणसांच्या श्रेणी पडल्या. कोणाला तरी श्रेष्ठ किंवा अभिजन मानले जाऊ लागले आणि कोणाला तरी कनिष्ठ किंवा नीच मानले जाऊ लागले. श्रेणी पाडण्याची किंवा मागण्याची जगभरातील पद्धत वेगवेगळी असली तरी पण सर्वत्र एक गोष्ट समान घडली. ती म्हणजे कनिष्ठ मानलेल्या गेलेल्या लोकांना श्रमाचे काम करणे भाग पडले. पण त्या श्रमांतून निर्माण झालेल्या संपत्तीचा उपभोग जास्त प्रमाणात श्रेष्ठ मानलेल्या लोकांनी घेतला. भारतात यात अजून एक भर पडली‌ ती म्हणजे श्रमिक गटातील लोकांना‌ अस्पृश्य मानले जाऊ लागले. मानवतेवरचा कलंक अशी समाजव्यवस्था नि...

महात्मा बसवेश्वर : मानवी‌ मूल्यांचा आग्रह

Image
      ' हे जग असे का आहे?' असे विचारणाऱ्यांनी जगात बदल घडवून आणले आहेत. पण ' हे जग असे का नाही?' असे विचारणाऱ्या माणसांनी जगात जास्त बदल घडवून आणले आहेत. अशाप्रकारे बदल घडवून आणणाऱ्या महान व्यक्तींमध्ये महात्मा बसवेश्वर स्वतःच्या आगळ्या कर्तृत्वाने, तेजाने , विचारांनी, कार्याने उठून दिसतात. काल पटलावर त्यांनी स्वतःची ठसठशीत नाम मुद्रा उमटवली आहे.         ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       पृथ्वीवर मानवी जीवनाची सुरुवात झाली.  सुरुवातीच्या काळात भटकणारा माणूस वेगवेगळ्या ठिकाणी हळूहळू स्थिर झाला. त्यातून समाजांची निर्मिती झाली. जगभर सर्व समाजांमध्ये काळाच्या ओघात वेगवेगळ्या प्रकारचे भेद निर्माण झाल्याचे आढळते. कालांतराने हे भेद दृढमूल झाले. हे भेद मोडण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागला.          महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्य सनाच्या १२ व्या शतकामध्ये मंगळवेढा (जि. सोलापूर, महाराष्ट्र) , कूडलसंगम, बसवकल्याण (जि. विजयपूर ,कर्नाटक) या सीमावर्ती भागात घडले. १२ व्या शतकात एकूणच हिंदू समाजाला जातीभेद ,अस...