छ.शिवराय : हिंदुंवरील आक्रमणाचा प्रतिकार
मध्ययुगीन काळातील मुस्लिम व ख्रिश्चन शासकांचा हेतू केवळ राज्य जिंकणे व संपत्तीची लूट करणे एवढेच होते असे मानणे भाबडेपणा ठरेल. धर्मप्रसार हा या राज्यकर्त्यांचा एक हेतू होताच. यासाठी अनेक क्रूर प्रकार केले जात. याची काही मोजकी उदाहरणे पाहूया. फ्रेंच प्रवासी ताव्हेर्निये लिहितो, " कालाबाग हे एक मोठे गाव आहे आणि येथे पुर्वी मुघल बादशहाला खंडणी देणारा एक मोठा राजा रहात असे. येणार्या-जाणार्या प्रवाशांकडून आणि व्यापाऱ्यांकडून तो मोठ्या प्रमाणावर लूट गोळा करीत असे, परंतु औरंगजेब राज्यावर आल्यानंतर त्याने या राजाचा आणि त्याच्या बऱ्याचशा प्रजेचाही शिरच्छेद केला. गावातील मुख्य रस्त्यांच्या नजीक असंख्य खिडक्यांचे मनोरे बांधून प्रत्येक खिडकीवर ठार मारलेल्या माणसाचे डोके ठेवले आहे. प्रत्येक दोन फुटांवर एक-एक डोके याप्रमाणे ही डोकी सर्व मनोऱ्यावर लावून ठेवण्यात आली आहेत. माझ्या मागच्या प्रवासाच्या वेळेस म्हणजेच सन १६६५ रोजी मी कालाबागवरून गेलो तेव्हा हे हत्याकांड होऊन फार दिवस झाले नसावेत , कारण त्यावेळेस ही डोकी शाबूत होती आणि त्यातून अत्यंत घाणेरडा दर्प येत होता." ...