Posts

Showing posts with the label अमेरिका

ओढवलेली वेळ

Image
                         (कथा)        ललिताबाई डोक्याला हात लावून बसल्या होत्या. काय करावे काहीच सुचत नव्हते. वेळच तशी ओढवली होती. समोर भुजंगरावांचा अचेतन देह पडला होता. त्याचे अंत्यसंस्कार करायला आता कोण मदत करील या प्रश्नाचे उत्तर काही ललिताबाईंना मिळत नव्हते.               (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र)    ललिताबाई आणि भुजंगराव यांचा संसार तब्बल चाळीस वर्षांचा. एका तालुक्याच्या गावात खाऊनपिऊन सुखी असलेला दोघांचा संसार. इतरांच्या मानाने तसा सुखवस्तूच. मुलगा दिनेश अगदी लहानपणापासून हुशार. शाळा महाविद्यालयात अगदी पहिल्या दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारा. स्वाभाविकच या छोट्या गावात त्याला पाहिजे तसं शिक्षण नव्हतं. म्हणून शाळा संपली की पुढच्या शिक्षणासाठी तो जो पुण्याला गेला तो गावापासून लांबच राहत गेला. आधी पदवी मग अमेरिकेत पदवीनंतरचे शिक्षण मग यथावकाश अमेरिकेत नोकरी आणि अमेरिकेचे नागरिकत्वही मिळाले.       ...

घटनात्मक लोकशाहीतील जलद न्यायासाठीची आव्हाने

Image
        काही दिवसांपूर्वी नसरापूर येथे लहानग्या मुलीवर पाशवी अत्याचार करुन तिला ठार मारण्याची संतापजनक घटना घडली. या घटनेने मुली आणि स्त्रियांवरील अत्याचारांचा मुद्दा पुन्हा एकदा ठळकपणे पुढे आला. या घटनेनंतर सर्वत्र निषेधाची, संतापाची लाट उसळली. अनेकांनी ताबडतोब न्यायाची मागणी केली. कुणी आरोपीची खांडोळी करा असे म्हटले. तर कुणी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्त्रीवर अत्याचार केला म्हणून रांझे गावचा पाटील बाबाजी भिकाजी गुजर याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून त्याचा चौरंग केला तशी शिक्षा करावी असे म्हटले. कोणीकोणी आरोपीचा एन्काऊंटर व्हावा अशी अपेक्षा केली. घडलेल्या हिडीस, नृशंस घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजमनात संताप असणे अगदी स्वाभाविक आहे. लोकांना तो संताप घटनात्मक चौकटीत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आपल्या देशात आहे. ही घटना घडल्यावर लगेच दोन तीन दिवसांत पुण्यात शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अशी घटना होता होता राहिली. पुन्हा समाजमन क्षुब्ध झाले. अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोषी ठरलेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा ताबडतोब व्हावी यावर विकृत माणसे वगळता कुणाचेही दुमत नाही. ...

विशाल हृदयाचे स्वामी विवेकानंद

Image
         "जोपर्यंत जगातील शेवटच्या व्यक्तिला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत मी कार्य करत राहीन."असा आपला निश्चय प्रकट करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचे हृदय अतिशय विशाल होते जगामध्ये दुःख, दैन्य, दारिद्र्य, अज्ञान याविषयी त्यांच्या मनात अपार करुणाभाव होता. या सर्व गोष्टी संपून संपूर्ण प्राणीमात्र सुखी झाले पाहिजे ही त्यांची तळमळ होती. "जगातील कट्टरतावाद, संकुचितपणा, धर्मांधता, सांप्रदायिकता यामुळे जगामध्ये वाहिले तेवढे रक्त पुष्कळ झाले. आता यापुढे यामुळे रक्तपात होणार नाही यासाठी सर्व धर्मपंथ संप्रदाय सत्य आहेत हे स्वीकारूया." ही प्राचीन वैदिक घोषणा यांनी पुन्हा एकदा उच्चारली आणि विश्वबंधुत्वाचे आवाहन केले. या बंधुत्वाने माणसाचे सहजीवन अर्थपूर्ण होऊ शकते याची त्यांना खात्री होती.                          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )      स्वामीजींचे विचार हे जगाला सर्वकाळ मार्गदर्शक आहेत. आपल्या वाटते विचार व्यक्त करणारी स्वामीजी ही एक व्यक्ती आहे. परंतु स्वामीजींनी आपले गुरुबंधू रा...

परदेशप्रवास आणि शाकाहार

Image
     भारतामध्ये शाकाहाराला काही समाजवर्गांमध्ये विशेष स्थान आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे भारतात सर्वत्र शाकाहारी अन्न सहजपणाने मिळते. विशेष अडचण येत नाही. परंतु अशा शाकाहारी व्यक्तींना ज्यावेळी परदेशी जाण्याची वेळ येते त्यावेळी मात्र अडचण होते. कारण परदेशात प्रामुख्याने मांसाहाराचा समावेश अन्नामध्ये होतो. याबाबत दोन ऐतिहासिक व्यक्तींचे अनुभव सांगणारा हा लेख आहे.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       महात्मा गांधी यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. ते निवारण्यासाठी परदेशी जाऊन शिक्षण घेऊन येणे हा पर्याय पुढे आला. तो पर्याय सगळ्यात जास्त योग्य वाटत होता. परंतु महात्मा गांधींच्या आई पुतळीबाई यांना आपल्या मुलाने परदेशी जाऊ नये असे वाटत होते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे परदेशी गेल्यावर आपल्या मुलाचे राहणीमान बदलून जाईल. आपल्या कुटुंबाच्या परंपरेला धरून ते राहणार नाही अशी त्यांना भीती वाटत होती. त्यामुळे महात्मा गांधी यांनी परदेशी जाण्यापूर्वी आपल्या आईला वचन दिले ते म्हणजे, " परदेशी मी मांसाहार...

स्वामी विवेकानंदांची कार्यशैली

Image
   स्वामी विवेकानंद यांनी आपल्या कार्याने पवित्र भारतभूमीला पुन्हा एकदा स्वत्वाची जाणीव करून दिली. आत्मविश्वास जागृत केला आणि शिकागो येथे १८९३ मध्ये भरलेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेच्या माध्यमातून जगाच्या व्यासपीठावर मानाचे स्थान मिळवून दिले. हे करत असताना त्यांची कार्यशैली कशी होती याबद्दल काही विचार मनात येतात.      ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       स्वामीजींचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस हयात असताना त्यांनी अनेक वेळा आपल्या प्रिय शिष्याला सांगितले होते की , " नरेन, तुला काली मातेचे कार्य करायचे आहे." परंतु ते नेमके कसे करायचे किंवा काय कार्य करायचे याबाबतची स्पष्ट कल्पना त्यांना मिळाली नव्हती. गुरूंच्या निधनानंतर सुमारे चार वर्षांनी स्वामीजी भारत भ्रमणासाठी बाहेर पडले. भारताची परिक्रमा पूर्ण केल्यावर भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारी येथे १८९२ च्या शेवटी त्यांना कार्याची स्पष्ट कल्पना मिळाली. त्यानंतर ते सप्टेंबर १८९३ मध्ये जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी तेथे आपला ठसा उमटवला. आपले कार्य पुढे नेण्यासाठी त्यांनी ठी...

काचेचे पेले

Image
    " काचेचे पेले आणू का? " वेटरने विचारले आणि आम्ही बुचळ्यात पडलो. काही क्षणानंतर खुलासा झाला. आमच्या डोक्यात प्रकाश पडला की काचेचे पेले म्हणजे तुम्ही दारू पिणार आहात का असे तो विचारतोय. आम्ही सांगितले की काचेचे नको स्टीलचे पेले आण.      मी साताऱ्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाची ही गोष्ट. बहुधा दुसऱ्या वर्षाला असताना एके दिवशी रात्रीच्या जेवणासाठी माझे मित्र प्रशांत डोंगरे, भास्कर वाळिंबे, स्नेहदीप करंदीकर, अभिजीत पंतोजी, संजय गायकवाड,  सचिन उपाध्ये, मी एका ढाब्यावर गेलो. त्यावेळी हा प्रसंग घडला.       अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यापूर्वी काही गोष्टी वारंवार कानावर पडायच्या. त्यातली एक म्हणजे अभियांत्रिकीचा अभ्यास खूप असतो. त्यामुळे रात्रभर जागून अभ्यास करावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे अभियांत्रिकीला शिकायला गेल्यावर सिगारेट प्यायची सुरूवात आपसूकच होते. मी मनाशी निश्चय केला की अभ्यासाचं नियोजन करायचे आणि करावं लागलं तर रात्री १२ पर्यंतच जागरण करायचं. तसेच व्यसनांपासून दूर रहायचं. मला दोन्ही गोष्टी जमल्या. आई,कै.बापू, संघ यांच्या संस्...

पुस्तक परिचय :- गोल्डा एक अशांत वादळ

Image
  लेखिका वीणा गवाणकर प्रकाशक इंडस सोर्स बुक्स, मुंबई नुकतेच हे पुस्तक वाचून पूर्ण केले. जवळपास दोन हजार वर्षे स्वतःचे राष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय अढळ ठेवत ज्यू लोकांनी १४ मे १९४८ ला इस्त्राइल राष्ट्र पुन्हा उभे केले. हे उभे करण्यामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका होती अशांपैकी एक म्हणजे गोल्डा मायर(१८९८-१९७८). त्या इस्राईलच्याच्या १९६९-१९७४ या काळातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. प्रवाही पद्धतीने लिहिलेल्या या पुस्तकातील भावलेले काही अंश ज्यांचे नाव गोल्डा यांना देण्यात आले त्या त्यांच्या पणजी ज्यूंच्या हालअपेष्टांची जाणीव रहावी म्हणून मीठ घालून चहा पीत असत. लहानपणी अमेरिकेत स्थलांतर झाल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षी शाळेतील गरजू मुलांसाठी निधी संकलनाचा कार्यक्रम आयोजित करून निधी जमा केला. पुढे मोठेपणी इसराइल साठी कोट्यावधी डॉलरचा निधी अमेरिकेतून उभा केला. संघटना, पक्ष यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीला वाहून घेतलेल्या गोल्डा अर्धशिशीमुळे दोन दिवस विश्रांतीसाठी घरी राहिल्या तर त्यांच्या लहान असलेल्या मेनाहेम,सारा या मुला-मुलींना अत्यानंद झाला आणि त्यांनी दोन्ही दिवस दंगा-मस्ती...