Posts

Showing posts with the label मराठवाडा

शब्द प्रयोगांच्या गमतीजमती

Image
           मध्यंतरी एका शैक्षणिक बैठकीत असताना बरोबरच्या एका उद्योजकांना त्यांच्या कारखान्यातून वारंवार फोन येत होते. बैठक संपल्यानंतर ते म्हणाले,‌ " तिकडे आग लागली आहे!".असं त्यांनी म्हटल्याबरोबर सगळ्यांना एकदम धक्का बसला. मग लक्षात येऊन मी म्हणालो, " आग लागली म्हणजे काहीतरी तातडीची आवश्यकता निर्माण झाली आहे. शब्दश: अर्थ घेऊ नका." मग जरा सगळ्यांना हायसं वाटलं.         बरेच वेळा चर्चा करताना शब्द, वाक्प्रयोग यामुळे गडबडी होतात. त्यामुळे एका विचारवंतांने म्हटले आहे, " चर्चा करायची असेल तर पहिल्यांदा आपण व्याख्या निश्चित करूया." असे झाले नाही तर घोटाळे होतात.      काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे.‌ आमच्या वसतिगृहातील एक विद्यार्थिनी बाहेर एकेठिकाणी जाते असे सांगून दुसरीकडे गेली होती. हे नंतर लक्षात आल्यामुळे तिच्या वडिलांना मी भेटायला बोलावले. मी त्यांना म्हणालो, " तुमची मुलगी परवानगी एके ठिकाणची घेऊन भलतीकडेच गेली होती." भलतीकडे असं मी म्हणताच ते रागावले. आमच्या सातारा जिल्ह्यात 'भलतीकडे' हा शब्द 'दुसरीकडे' या अर्थानेही ...

मी शिकलो मराठवाड्यातील शब्द

  " नीट जायचं." समोरचा माणूस म्हणाला आणि बुचकळ्यातच पडलो. संघाच्या कामासाठी दोन वर्षे (जून१९९७- जून१९९९) मराठवाड्यात राहण्याचा योग आला. या काळात तिथले नवनवीन शब्द मला शिकायला मिळाले. एकदा एके ठिकाणी मी रस्ता विचारण्यासाठी थांबलो. तर समोरच्या माणसाने उत्तर दिले ,"नीट जायचं." मी सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातला. मी विचार केला, अरे मी तर नीटच (व्यवस्थित) चाललोय. वेडावाकडा नाही. नंतर उलगडा झाला नीट जायचं म्हणजे सरळ जायचं. बरेच वेळा अनेक जण सांगायचे, "इथेच आमचा ठेपा असतो." ठेपा म्हणजे अड्डा हे कळायला मला बरेच दिवस गेले. नंतर मी ही म्हणू लागलो की ,"तुम्ही ठेप्यावर भेटला नाहीत." ठेपा यासारखा मोंढा हा देखील एक शब्द लक्षात राहिला. मोंढा म्हणजे घाऊक खरेदी-विक्री बाजारपेठ. सातारा जिल्ह्यात सहजपणे म्हटलं जातं ,'काय करतो तुमचा पोरगा". पण मराठवाड्यात 'लेकरू'हा शब्द सहजपणे जास्त वापरला जातो. नंतर लक्षात आलं की समर्थ रामदास हे मराठवाड्यातील त्यामुळे त्यांच्या रचनेत 'लेकरू' शब्द आढळतो ," जननी जनक माया लेकरू काय जाणे?" ...