प्रेरणास्रोत: राणी मां गायडिनल्यू
भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेकानेक व्यक्तिंनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. आपण नि:संशयपणे त्यांचे ऋणी आहोत. परंतु भारताची विशालता, इतिहासाची माहिती देण्याचे तुटपुंजे प्रयत्न, अनास्था अशा अनेक कारणांमुळे सामान्य माणसांना इतिहासाची अगदी मोजकी माहिती असते. तीदेखील प्रामुख्याने आपल्या परिसरातील व्यक्तिंची. अशाच अपरिचित व्यक्तिंपैकी एक आहेत नागा जनजातीमधील तेजशलाका राणी मां गायडिनल्यू! ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) २६ जानेवारी १९१५ हा त्यांचा जन्मदिवस! नागा जनजातीमधील रोंगमेई समाजात पिता लोथोनांग व आई केलुवतलिनलयू यांच्या पोटी त्यांचा जन्म सध्याच्या मणिपूरमध्ये झाला. असे सांगितले जाते असे की जन्माच्या वेळी नाळेचा वेढा त्यांच्याभोवती मानेभोवती पडला होता. तो सोडवून त्यांचा जन्म झाला. त्यामुळे ही मुलगी आयुष्यात काहीतरी विलक्षण करून दाखवेल अशी आई-वडिलांची खात्री पटली त्यामुळे त्यांचे नाव ठेवण्यात आले गायडिनल्यू! यातील 'गाय' म्हणजे 'चांगला' 'डिन' म्हणजे '...