Posts

Showing posts with the label नर्मदा परिक्रमा

सामाजिक जाणिवेतून कृती करणाऱ्या व्यक्तिंची आनंददायक भेट

Image
            गेल्या काही दशकांपासून आमच्या म.ए.सो. महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहात दरवर्षी 'सामाजिक रक्षाबंधन' हा उपक्रम घेण्यात येतो. यामध्ये समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तिंना आमंत्रित करण्यात येते. त्यांचे कार्य, अनुभव यांचा परिचय वसतिगृहात राहणाऱ्या मुलामुलींना करून देण्यात येतो. यावर्षी या उपक्रमामध्ये निवृत्त हवामान शास्त्रज्ञ डॉ.मिलिंद मुजुमदार यांना बोलावण्यात आले होते. (मध्यभागी टोपी घातलेले डॉ. मिलिंद मुजुमदार, त्यांच्या उजवीकडे श्री प्रशांत कुलकर्णी)             वसतिगृहातील मुलामुलींनी मिलिंदराव यांची मुलाखत घेतली. त्यातून त्यांच्या कार्याची ओळख उपस्थितांना झाली. मूळचे खंडवा, मध्य प्रदेश येथील रहिवासी असलेल्या मिलिंदराव यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दीर्घकाळ पुण्यातील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरियॉलॉजी' (IITM) या संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून काम केले आणि सुमारे दोन वर्षांपूर्वी ते निवृत्त झाली. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला व्हावा यासाठी मिलिंदराव सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यासाठी विविध ठिकाणी तापमान...

तर्काच्या पलिकडले काही...

मानव हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. बुद्धीच्या जोरावर मानवाने आपल्या जीवनात मोठी प्रगती केली आहे. बुद्धी समर्थ असल्याने मानव बुद्धिच्या, तर्काच्या आधारावर विचार करतो असे आढळून येते. परंतु काहीवेळा बुद्धिच्या आधारावर जो तर्क केला जातो त्याच्या पलिकडीचे अनुभव येतात आणि ते विचार करण्यास भाग पाडतात. श्रेष्ठ महात्मे रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रातील प्रसंग प्रसिद्ध आहे. बहुधा त्यांच्या अंतिम काळातील हा प्रसंग आहे. तेव्हा ते कलकत्त्यामध्ये काशीपूर भागात आपल्या शिष्यांसोबत राहत असत. रामकृष्ण हे वारंवार समाधी अवस्थेत जात असत याचा अनुभव त्याच्यांबरोबर असलेल्या अनेक जणांनी अनेक वेळा घेतला आणि काहीजणांनी तो लिहून ठेवला आहे. असेच एके दिवशी ते ध्यानस्थ बसलेले असताना मनाने ते घरासमोरील हिरवळीशी एकरूप झाले. थोड्या वेळात कुठूनतरी एक गाय आली आणि त्या ठिकाणी चरू लागली. रामकृष्णांची समाधी भंगली आणि त्यांनी वेदनेचा उद्गार काढला. काही जणांच्या लक्षात येऊन त्यांनी त्या गाईला दूर घालवून दिले. रामकृष्णांच्या जवळ येऊन बघतात तर त्यांच्या छातीवर गाईच्या खुराचे निशाण उमटले होते. हिरवळीवर असलेल्या गा...