आगळी राखीपौर्णिमा
(कथा) " ताई, अगं राखी पौर्णिमेला तू येशील. परंतु मला ओवाळून घ्यायला जागा कुठंय? इथे माझ्या खोलीवर काही व्यवस्था नाही." शेजारी उभ्या असलेल्या एका तरुणाचं वाक्य जयवंतरावांच्या कानावर आदळलं आणि त्यांनी चमकून पाहिलं. एक विशीतला तरुण त्याच्या मोबाईलवर बोलत होता. पुढे जाणारे जयवंतराव तिथंच थबकले. थोडा वेळ ते तिथेच थांबले. काही मिनिटांत त्या तरुणाचं बोलणं संपलं. जयवंतराव त्याच्याकडे बघतच होते. त्याच्या डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. ते त्याच्या जवळ गेले आणि विचारू लागले, " अरे मुला, काय झालं?" त्या तरुणांना सांगितलं. शिकण्यासाठी तो शहरात आला होता. हे त्याचं पहिलंच वर्ष. एका खोलीवर राहून तो शिकत होता. राखीपौर्णिमेला घरी जाणं शक्य नव्हतं म्हणून त्याच्या बहिणीचा फोन त्याला आला होता. " राखी पौर्णिमेला तू येत नाहीस तर मी तिकडे येऊन तुला राखी बांधते." असं ती म्हणत होती. पण राखी कुठे बांधणार कारण त्याच्या खोलीवर तशी व्यवस्था नव्हती. ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या स...