आचार्य अत्रे यांची पत्रकारिता
आचार्य अत्रे यांचा पत्रकारितेच्या क्षेत्रातलादेखील प्रवेश अतिशय योगायोगाने झाला. सुरुवातीला शिक्षण क्षेत्र, नाट्य क्षेत्र व्याख्याने यामधून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले होते. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कारणांनी त्यांनी त्यावेळी चालू असलेल्या नियतकालिकात लेखन केले होते. परंतु स्वतः पत्रकार क्षेत्रात प्रवेश केला नव्हता. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) नवयुग चित्रपट कंपनीची स्थापना करताना अत्रे यांचा संबंध बापूराव राजगुरू यांच्याशी आला. राजगुरू हे 'राष्ट्रीय सुविचार प्रसारक मंडळी' यांच्या वतीने प्रसिद्ध होणारे ' दैनिक लोकशक्ती' हे वर्तमानपत्र चालवित असत. अचानकपणे हे काम त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. परंतु संपादक आणि इतर कर्मचारी यांना मात्र संस्थेने कामावर घ्यायचे नाकारले. आचार्य अत्रे राजगुरू यांच्यासोबत या सर्व लोकांना भेटायला गेले असतांना त्यांच्यावर कोसळलेली बेकारीची कुऱ्हाड लक्षात घेऊन आचार्य अत्रे यांनी 'मी साप्ताहिक सुरू करतो.' असे आश्वासन दिले. काही दिवसातच त्यांनी 'नवयुग' हे साप्ताहिक सुरू केले. हे वर्ष होते ...