पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर काही जीवन प्रसंग
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या व्यक्तिच्या जीवनाला दिव्यत्वाचा स्पर्श झालेला असतो. पारलौकिक पातळीवर विचार करण्याची क्षमता असणाऱ्या अशा व्यक्तिंनाही व्यावहारिक पातळीवर बरे वाईट अनुभव येत असतात. अशा वेळी आपल्या दिव्यत्वाची कास न सोडता अशा प्रसंगांना त्या सामोरे जात असतात. अहिल्याबाई यांच्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग घडले. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) अहिल्याबाई यांचे पती खंडेराव यांचे ऐन तारुण्यात निधन झाले. कर्तबगार सासरे मल्हारराव होळकर यांचेही काही वर्षांनंतर निधन झाले. पेशव्यांनी अल्पवयीन मुलगा मालेराव याला जहागिरीचा वारसदार नेमले. तोही अकाली मरण पावला. सर्व राज्य कारभार अहिल्याबाई बघत होत्या. लष्करी आघाडी सांभाळण्यासाठी नातेवाईक तुकोजी होळकर यांना सेनापती म्हणून नेमले. होळकर आणि शिंदे मिळून उत्तर भारताचे राजकारण चालवत होते. तुकोजी यांनी लष्करी आघाडी सांभाळायची आणि अहिल्याबाई यांनी प्रशासन अशी योजना होती. पण हळूहळू तुकोजी अहिल्याबाई यांना पुरेसा मान देईनासे झाले. सहकार्य करनेसा झू. मोहिमेचा खर्च...