Posts

Showing posts with the label बौद्ध धर्म

संत गाडगेबाबांची शिकवण

Image
       हल्ली जिकडे तिकडे माणसे मोबाईल मध्ये तासनतास गुंतून पडलेली दिसतात. त्यामुळे वेगळा विचार मनात येणे, त्याच्यावर काही चिंतन करणे आणि त्यातून काही निष्पन्न होऊन आयुष्याला दिशा मिळणे अशा गोष्टी कमी होत चाललेल्या दिसतात. अशी माणसे बघितली की बऱ्याच वेळा मला गाडगेबाबांची हमखास आठवण येते. गाडगेबाबांच्या एकांतातील चिंतनातून त्यांचे स्वयंभू व्यक्तिमत्त्व घडले असे मला वाटते. यामुळेच अशी मोबाईलमध्ये सतत गुंतलेली माणसे दिसली की गाडगेबाबांची आठवण येते.         ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )          माणूस शिक्षणाने प्रगल्भ होत जातो असे म्हणतात. परंतु सर्वच माणसे शिक्षणामुळे प्रगल्भ झाली आहेत काय असा प्रश्न मनात येण्यासारख्या घटना आजूबाजूला घडताना दिसतात. जे रूढार्थाने शिकले नाहीत त्यांच्यातदेखील शहाणपण असते. प्रगल्भता असते. नव्हे नव्हे काहीजण तर शिकलेल्यांपेक्षाही अधिक प्रगल्भ दिसतात. अशाच मालिकेतील एक नाव म्हणजे संत गाडगेबाबांचे! रूढार्थाने त्यांचे शिक्षण झाले नाही. परंतु लहानपणी गावाबाहेर जाऊन जनावरांना चरायला घेऊन जाणे हे त्या...