Posts

Showing posts with the label ‌‌ स्वदेशी जागरण मंच

वयाचा परिणाम

Image
      "आप की दिखाई देनेवाली आयु कम है और जो आयु है वो जादा है" संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि स्वदेशी जागरण मंचाचे पदाधिकारी श्री.कश्मीरीलाल मला म्हणाले. ही गोष्ट २०१७ किंवा २०१८ मधील आहे. असा अनुभव मला अजून काही वेळा आलेला आहे.            जन्मदिनाकांनुसार माणसाचे वय ठरते. पण इतरांना वाटणारे वय काहीवेळा कमी वाटते किंवा जास्त वाटते. त्यातून वरील प्रकारचे संवाद होतात. ( बालगंधर्व)           ( छोटा गंधर्व) (दोन्ही छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)          वयाचा परिणाम वेगवेगळ्या माणसांवर वेगवेगळा होत असतो. मध्यंतरी बालगंधर्व या उपाधीने सन्मानित नारायणराव राजहंस आणि छोटा गंधर्व उपाधीने सन्मानित सौदागर नागनाथ गोरे या दोघांच्या ७५ निमित्त घेतलेल्या वेगवेगळ्या मुलाखती ऐकण्यात आल्या. बालगंधर्वांच्या आकाशवाणीवरील मुलाखतीत त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या पण विस्मरणाचा परिणाम, तसेच बोलण्यात अस्पष्टता जाणवत होती. गायन करण्याच्या स्थितीत मात्र ते नव्हते. छोटा गंधर्व यांची मुलाखत दूरदर्शनने घेतलेली होती. त्यात त्यां...