Posts

Showing posts with the label अपवाद

लखलखीत अपवाद

Image
         अनुभव, निरीक्षण, परंपरा यांमधून काही नियम निर्माण केले जातात.  इंग्लिश भाषेत एक म्हण अशी आहे की, 'Exception proves the rule.' अपवाद हे नियम सिद्ध करतात. नियम सरसकट लागू होत नाही. अशा काही अपवादांचा विचार करता येईल.     ‌‌‌‌‌  विजेचा तीव्र धक्का बसला की माणसाचा मृत्यू होतो हा नियम आहे.‌ पण याला काहीजण अपवाद आहेत.‌ एक राज मोहन नायर या नावाची व्यक्ती आहे. त्यांच्यावर विजेच्या धक्क्याचा काहीही परिणाम होत नाही. गुगल, यूट्यूब यावर ' इलेक्ट्रिक मॅन ऑफ इंडिया ' या नावाने शोध घेतला तर ह्याचे व्हिडिओ, फोटो बघता येतात. विजेची तार तोंडात धरून ते दिवा पेटवणे यासारखी कामे करताना दिसतात. त्यावेळी लक्षात येते की हा एक अपवाद आहे.    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        अपवादाचे अजून एक उदाहरण संगीत क्षेत्रातील आहे. भारतीय शास्त्रीय संगीत ही एक अद्भुत गोष्ट आहे. दीर्घकाळचे प्रयत्न, प्रयोग, परंपरा यातून ते विकास पावलेले आहे. या संगीतात रागदारीचे नियम हजारो वर्षांपासून ठरलेले आहेत. ते नियम पाळूनच गायन करता येते. ते नियम म...