Posts

Showing posts with the label म.ए.सो. महाविद्यालयीन वसतिगृह

वसतिगृहात नव्याने रहायला लागल्यावर..

"सर, आमची प्रणिता( नाव बदललं आहे.) अकरावीला नापास झाली.एवढी हुशार मुलगी नापास कशी झाली"...पालक " मी आता माझ्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमात आहे. नंतर बोलूया."... मी १४ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग माझ्या लक्षात राहिला आहे. वसतिगृहात दरवर्षी मोठ्या संख्येने मुलेमुली ११ वी, महाविद्यालयाचे प्रथम वर्ष यासाठी प्रवेश घेतात. ११ वी चं वय तर अधलंमधल , पौगंडास्थेतील असत. छोट्या गावातून ,शहरातून आलेल्या अनेक मुलांवर पुण्यासारख्या मोठ्या शहराचे दडपण येतं. महाविद्यालयातील शिकवण्याची पद्धत वेगळी असते. मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलामुलींना इंग्रजी भाषेचे दडपण जाणवत असते. गेल्या काही वर्षांत ज्यांनी खाजगी शिकवणी वर्ग प्रवेश घेतला आहे अशा बहुतेकांचे शिकवणी वर्गाला तिथल्या अभ्यासाला जास्त प्राधान्य असतं. आणि महत्त्वाचे म्हणजे घर सोडून पहिल्यांदाच बाहेर राहणाऱ्यांना घरची सारखी आठवण येत असते. अशाच आणखी काही चिंता असतात. मी दहावी उत्तीर्ण झाल्यावर पुण्यात सर परशुराम महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि वसतिगृहात राहायला आलो. पहिले दीड दोन महिने मला रोज पाचच्या सुमारास असं वाटायचं की ...

मनाचं आजारपण स्वीकारूया..

  "सर, मी कुठे आहे ते मला समजत नाही." पार्थ (नाव बदललं आहे.) म्हणाला. "जवळपास कोणत्या पाट्या दिसत आहेत ते मला सांग. असं कर, तू रिक्षा करून होस्टेलला ये." मी म्हणालो. मनाचं आजारपण असलं की माणूस शरीराने धडधाकट असूनदेखील व्यवस्थित राहू शकत नाही. वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांच्या मनाच्या आजारपणाचे अजून दोन अनुभव मला आले. पार्थ हा पुण्याजवळच्या एका गावातील हुशार मुलगा. त्याचे काका डॉक्टर होते. त्यांच्याकडे बघून यानंदेखील डॉक्टरच व्हायचं असं घरच्यांनी ठरवून टाकलं आणि आमच्या महाविद्यालयात त्याला अकरावीला प्रवेश घेऊन दिला. परंतु इथल्या अभ्यासक्रमाशी, परिस्थितीशी जुळवून घेताना त्याला खूप अडचणी येऊ लागल्या. पहिले सहा महिने व्यवस्थित गेले. परंतु दुसऱ्या सत्रात अचानक एके दिवशी घरच्यांना लक्षात आलं की पार्थ फोन उचलत नाही आणि त्याच्या जोडीदाराला तो कुठे गेला आहे हे पार्थने सांगितलं नाही. पालकांनी मला फोन केला आणि परिस्थिती सांगितली. मी पार्थला फोन केला. चांगली गोष्ट झाली म्हणजे त्यानं माझा फोन घेतला. मी त्याला सांगितलं की, " तू मला भेटायला लगेच ये. तू कुठे आहेस?" असं विचा...

२००९ च्या स्वाईन फ्लू साथीच्या आठवणी

Image
  विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकामुळे मार्च २०२० मध्ये वसतिगृह रिकामे झाले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या.                                                                      ( सामसूम असलेले वसतिगृह) २००९च्या पावसाळ्यात सुरुवातीला पुण्यामध्ये स्वाइन फ्लूची साथ सुरू झाली. रोज वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या. सर्दी खोकला असलेल्या लोकांना आपल्याला स्वाईन फ्लू झाला आहे असे वाटू लागले. त्यातच आमच्या वसतिगृहातील एक विद्यार्थी सचिन काटे याला दोन-तीन दिवस सर्दी पडशाचा त्रास सुरू होता. त्याच्यावर शेजारील संजीवन रुग्णालयात उपचार चालू होते. पण दोन-तीन दिवसांनी ही फरक पडेना म्हणून तेथील डॉक्टरांनी स्वाईन फ्लूची चाचणी करण्यास सांगितले. यावेळेस आज जशी करोनाची चाचणी एकाच ठिकाणी उपलब्ध आहे तशीच स्वाईन फ्लूची चाचणी केवळ पुणे महानगरपालिकेच्या नायडू रुग्णालयात उपलब्ध होती. सचिनला स्वाइन फ्लूच...

वसतिगृहातील मुलींच्यासाठी वेगळा कार्यक्रम

Image
  २०/०३/२०२० या दिवशी दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर दिल्लीमधील निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात आले. डिसेंबर २०१२ मध्ये तो घृणास्पद , पाशवी अत्याचार घडला.                                                                       ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) त्यामुळे पुन्हा एकदा आठवण झाली.भारतातील अन्य ठिकाणांप्रमाणेच आमच्या म.ए.सो. महाविद्यालयीन वसतिगृहातील मुला-मुलींच्यात देखील दुःखाचे ,संतापाचे वातावरण होते. सायली जोशी, अभिषेक भोसले,प्रणव कुलकर्णी (सांगलीचा ) , ओंकार देशमुख या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन मुलींच्या मनोरंजनगृहात ( कॉमनरूम )मध्ये एक शोकसभा उस्फूर्तपणे आयोजित केली. मुलांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. मी देखील मुलांशी संवाद साधला. हे सगळं चालू असताना वसतिगृहातील मुलींच्यासाठी काही वेगळा कार्यक्रम करावा असं मनात येत होतं. वसतिगृह प्रमुख आणि प्राचार्य ...