Posts

Showing posts with the label राहुल द्रविड

संत तुकाराम आणि आजची परिस्थिती

Image
  गेली अनेक शतके महाराष्ट्राच्या मनाची मशागत करणाऱ्या वेगवेगळ्या पंथ, संप्रदायांमध्ये वारकरी संप्रदायाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संप्रदायात संत बहिणाबाई यांचा " ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस " हा उल्लेख असणारा अभंग प्रसिद्ध आहे. या अभंगांमध्ये ज्यांचे वर्णन वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून केले आहे त्या संतश्रेष्ठ तुकाराम यांचे अनेक अभंग हे समाजाला शाश्वत मार्गदर्शन करणारे आहेत. महान व्यक्तिंच्या जीवनात काही भाग ते जेव्हा जगत असतात त्या काळासाठी असतो. तर त्यांची शिकवण ही चिरकालिक असते असे लक्षात येते. संत तुकाराम यांच्याबद्दल देखील हेच म्हणता येईल. त्यांच्या शिकवणुकीतील काही गोष्टींचा विचार करूया. माणसाच्या आयुष्यासाठी पैसा ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. परंतु हा पैसा किंवा धन हे चांगल्या मार्गाने मिळवावे आणि ते मिळवल्यानंतर केवळ आपल्यासाठी आहे असा न विचार करता समाजाचा देखील विचार करावा हे संत तुकारामांनी सांगितले आहे. ते म्हणतात " जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी " आपल्या आजूबाजूला देखील समाजामध्ये अशी माणसे दिसतात की जी अतिशय प्रामाणिकपणे आपल...