वेळ पाळणे?!
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला गेलो होतो संयोजकांकडून आलेल्या निरोपाप्रमाणे बरोबर अकरा ते साडेअकरा असा वेळ देण्यात आली होती. त्याप्रमाणे पावणे अकरा वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो. त्यावेळी संयोजकांपैकी एका प्रमुख व्यक्तीचे भाषण सुरू होते. त्यांचेच भाषण बरेच लांबले सहाजिकच पुढील कार्यक्रम देखील लांबतच गेला. आम्हाला सांगितलेल्या वेळेपेक्षा जवळपास २५-३० मिनिटे उशीरा संधी देण्यात आली. कार्यक्रमातील सहभाग घेऊन आम्ही बाहेर पडलो. तेव्हा या उशिराबदद्दल आमची थोडी चर्चा झाली. त्यावेळी गंमतीने मी म्हटले, " आपल्याकडे कार्यक्रम ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा सुरू झाला तर तो वेळेवर उशिरा सुरू झाला असे म्हटले पाहिजे." त्याच्या पुढे उशीर झाला तर मग उशीरा उशीरा, खूप उशीरा, फारच उशीरा असे शब्द वापरले पाहिजेत." सोबतच्या व्यक्तीला देखील ते पटल्यासारखे झाले आणि तो हसला. वेळ पाळण्याबाबतचा इतिहासातील एक महत्त्वाचा प्रसंग हा छ. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील आहे. मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी तह केल्यानंतर मोगली फौजेच्या जोडीने महाराज आदिलशाही मुलखावर चालून जा...