Posts

Showing posts with the label भगिनी निवेदिता

स्वतःचे मरण ठरवणारा महापुरुष

Image
      नुकताच एका प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांच्या भाषणाचा व्हिडिओ ऐकला त्यात ते म्हणाले की लाखांमध्ये एखाद्याला शांतपणे मरण येते. त्यावेळी मनात विचार आला की असे मरण कोणाला बरे आले होते बरे? ते अचानकपणे आले की ठरवून आले? विचार करायला लागल्यानंतर लक्षात आले की स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण याबाबत देता येईल महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामीजींनी ठरवून मरण स्वीकारले. याबाबत त्यांचे गुरुबंधू , शिष्य यांनी आठवणी लिहून ठेवल्या आहेत त्यावरून ही गोष्ट सिद्ध होते. ( छायाचित्र सौजन्य https://vedantaprov.org/swami-vivekananda/ )        स्वामीजींच्या एक पाश्चात्य शिष्या होत्या. त्यांचे नाव जोसेफाईन मॅकलाऊड. स्वामीजींच्या मृत्यूच्या आधी काही महिने त्या म्हणाल्या , " स्वामीजी मी आपल्याला दर महिन्याच्या खर्चासाठी ५० डॉलर्स देईन. आता मी तुम्हाला एकदम चार महिन्यांसाठी दोनशे डॉलर्स देते. " स्वामीजी म्हणाले की , "एवढे सगळे खर्च होण्याची वेळ येणार नाही." आणि तसेच झाले तीनच महिन्यांनी स्वामीजींचे निधन झाले.        स्वामीजी अनेक वेळा म्हणत असत, " मी चाळीशी पूर्...

रामकृष्ण परमहंस - स्वामी विवेकानंद - भगिनी निवेदिता

Image
गुरूला दिवसा पहावे आणि रात्रीही पहावे अनेक वेळा तथाकथित आध्यात्मिक साधू, बुवा यांनी लोकांची फसवणूक केली असे लक्षात येते. त्या वेळेला जर बारकाईने माहिती घेतली तर असे आढळून येते की फसवल्या गेलेल्या लोकांनी आंधळेपणाने विश्वास ठेवला.                                                                                ( रामकृष्ण परमहंस ) याबाबत रामकृष्ण परमहंस यांची एक आठवण अतिशय उद्बोधक आहे. एकदा त्यांच्या एका शिष्याच्या लक्षात आले की गुरुदेव रामकृष्ण परमहंस रात्रीचे उठून बाहेर निघाले आहेत. त्याच्या मनात शंका निर्माण झाली. तो लपत-छपत त्यांच्या मागे गेला आणि ते कुठे जात आहेत हे पाहू लागला. झाले असे होते की रामकृष्णांना शौचासाठी बाहेर जायचे होते. त्यामुळे ते बाहेर पडले होते आणि ते बाहेर जाऊन परत येताना त्यांना हा शिष्य भेटला. त्यावेळेला ते त्याला म्हण...

स्वामी विवेकानंद - शेवटचे दिवस

Image
                                                                                      ( स्वामी विवेकानंद ) ४ जुलै १९०२ या दिवशी स्वामी विवेकानंदांचे निधन झाले. महान व्यक्तिंना त्यांच्या निधनाची पूर्वकल्पना असते असे वाटते. महाभारतामध्ये भीष्माचार्यांची गोष्ट आहे. त्यांना इच्छामरणाचा वर मिळाला होता.त्याप्रमाणे त्यांनी आपल्या मृत्यूचा दिवसही निश्चित केला होता. अनेक महान व्यक्तींबद्दल असे म्हणता येते.स्वामी विवेकानंदांना आपला निधनाचा दिनांक ४ जुलै असावा असे वाटत होते. त्या महिन्याच्या दिनदर्शिकेवर ४जुलैच्या दिनांकावर त्यांनी खूण करून ठेवली होती. दोन दिवस आधी त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता त्यांना भेटायला आल्या. स्वामीजींनी त्यांच्याशी वार्तालाप केला. त्यांना प्रेमाने जेवू घातले. जेवण झाल्यानंतर स्वामीजींनी भगिनी निवेदितांच्या हाताव...

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही अद्भुत प्रसंग....(भाग ३ )

Image
                                                                                                ( स्वामी विवेकानंद ) ७ भारतभ्रमणाच्या काळात गाजीपुर येथे पवहारी बाबांशी नरेंद्राची भेट झाली. नरेंद्राने त्यांचे शिष्यत्व पत्करावे असे ठरवले. सलग एकवीस दिवस रामकृष्ण नरेंद्राच्या स्वप्नात येऊन अश्रू ढाळत. त्यानंतर नरेंद्राने पवहारी बाबांचा अनुग्रह घेण्याचा विचार सोडून दिला. ८ भारतभ्रमणाच्या काळात एके दिवशी नरेंद्र स्नानासाठी नदीमध्ये उतरला. तेव्हा त्यांची वस्त्रे माकडाने पळवून नेली. नरेंद्र नग्नावस्थेत जवळच्या जंगलात माणसांपासून दूर जाऊ लागला. तेव्हा कुठून तरी एक व्यक्ती नवीन वस्त्रे घेऊन आला आणि त्याने ती वस्त्रे नरेंद्राला दिली. ९ भारतभ्रमणाच्या काळात एके दिवशी नरेंद्र आगगाडीतून प्रवास करीत होता. त्याच्या ...