आचार्य अत्रे यांच्या घरगुती आठवणी
प्रसिद्ध व्यक्तिंच्या खाजगी आयुष्याबद्दल स्वाभाविकपणे अनेकजणांना कुतुहल असते. आचार्य अत्रे यांच्या आयुष्याबाबतदेखील त्या काळात अनेक लोकांना कुतुहल होते. त्यांच्या कन्या प्रसिद्ध साहित्यिक शिरीष पै यांनी नियतकालिके , वृत्तपत्रे आणि 'पपा' या आपल्या पुस्तकात आचार्य अत्रे यांच्या घरगुती अनेक आठवणी लिहून या कुतुहलाचे काहीसे शमन केले आहे. 'कवी दिसतो कसा आननी?' यांसारख्या प्रश्नाचे काही उत्तर त्यातून मिळते. ( आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै आणि मीना देशपांडे. छायाचित्र हर्षा देशपांडे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार ) मनस्वी जगणारे, चांगल्याचे भरभरून कौतुक करणारे आणि आपल्या विरोधकांवर आवेशाने तुटून पडणारे अत्रे घरगुती वातवरणात प्रेमळ पती, पिता, आजोबा अशा अनेक भूमिका पार पाडत होते. मुलींच्या विवाहांदरम्यान आनंदाने भावूक होऊन अश्रू गाळत होते. त्यांचे कोडकौतुक करत होते. परदेशी गेल्यावर आवर्जून नातवंडांसाठी भेटवस्तू, खेळणी आणत होते. शिरीष पै आवर्जून लिहितात की त्या लहान असताना दिवसा माणसांच्या गराड्यात असलेले हास्याची कारंजी विनो...