छ. शिवराय आणि पाश्चात्य योद्धे
चैत्र पौर्णिमा शके १६०२ रौद्र नाम संवत्सर म्हणजेच ३ एप्रिल १६८० या दिवशी छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला. एक अलौकिक महापुरुष पंचतत्वात विलीन झाला. हिंदवी स्वराज्यावर दुःखाची अतीव छाया पडली. या महापुरुषाचे वेगवेगळे गुण सर्वकालिक आदर्श आहेत. त्यातील त्यांचा युद्ध कौशल्याचा गुण देखील निर्विवाद आहे. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) छत्रपती शिवरायांचा पराक्रम अतिशय जबरदस्त होता. त्यांच्या तलवारीच्या धाकामुळे शत्रूच्या हृदयात धडकी बसत असे. कविराज भूषणाने तर अशी कल्पना मांडली की 'शंकराचे गण, भूत, पिशाच्च हे एकमेकांशी आनंदाने संवाद करीत निघाले आहेत. या आनंदाचे कारण असे की शिवरायांनी कोणातरी शत्रूवर चाल केली आहे. तिथे शिवरायांच्या पराक्रमामुळे प्रेतांचा खच पडेल आणि तो आपल्याला उपयोगी पडेल म्हणून हे सर्वजण आनंदित आहेत. शिवरायांच्या जन्मापूर्वीच पाश्चात्य देशांनी भारतावर वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण करायला सुरुवात केली होती. काही देशांनी व्यापारी म्हणून भारतात बस्तान ब...