Posts

Showing posts with the label कान्होजी जेधे

शिवरायांचे सलगी देणे कैसे असे

Image
  छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन विलक्षण आहे.अनेक वेगवेगळे पैलू त्यांच्या जीवनात दिसतात. त्यात त्यांनी जोडलेली माणसे आणि त्यांना दिलेले हिंदवी स्वराज्याची प्रेरणा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. सुरुवातीपासून त्यांच्याबरोबर असलेले अनेक जण त्यांनी स्वराज्याच्या कामात जोडून घेतले हे तर आहेच. शिवरायांशी शत्रुत्व करणाऱ्याकडची माणसे त्यांनी पारखून स्वराज्याच्या कामात जोडली हा एक वेगळा महत्वाचा पैलू आहे. समोपाचाराचे सर्व प्रयत्न संपल्यावर जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्यावर हल्ला चढवला. त्या लढाईत त्वेषाने लढणारे मुरारबाजी देशपांडे महाराजांच्या पारखी नजरेने लगेच हेरले. त्या लढाईत जय मिळवल्यानंतर महाराजांनी मुरारबाजी यांना स्वराज्याच्या कामात सहभागी होण्याची साद घातली. मुरारबाजी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ते स्वराज्याच्या कामी रुजू झाले. १६६५ मध्ये त्यांनी गाजवलेला पराक्रम इतिहासात नोंदवला गेला आहे. पुरंदरच्या किल्ल्यावर असलेल्या त्यांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यावरचा आवेश पाहण्यासारखा आहे. त्यांच्या पराक्रमाचे वर्णन कवीने केले आहे. मातेच्या स्वातंत्र्यास्तव धडही लढते संग्रामात किंवा मु...