Posts

Showing posts with the label सहल

सहलींचे अनुभव

Image
    " आपण बरोबर रस्त्याने चाललो आहोत का हे खात्रीने सांगता येत नाही,"प्रशांत भिरंगे म्हणाला. थंडीचे दिवस सुरू झाले होते.रात्र झाली होती. आजूबाजूला पाच सहा फूट वाढलेलं गवत होतं.आम्ही पायवाटेने राजमाची गडाच्या दिशेने चालत निघालो होतो. आमच्यापैकी केवळ प्रशांत भिरंगे हा त्यापूर्वी एकदा गडावर येऊन गेला होता.     गोष्ट बहुधा १९९६ च्या नोव्हेंबर महिन्यातील आहे. त्यावेळी मी पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरी करत होतो आणि मंगळवार पेठेत राहत होतो संघाच्या रचनेत त्या भागाला शाहूनगर असे नाव होते. त्या शाहूनगरातील प्रतापादित्य या सायम् शाखेचा मी मुख्य शिक्षक म्हणून काम करत होतो. दिवाळीच्या सुट्टीमध्ये नगराच्या शाखांतील बाल म्हणजेच विद्यार्थी स्वयंसेवकांची सहल राजमाची या गडावर घेऊन जायची असे आम्ही ठरवले. सहल घेऊन जाण्यापूर्वी आधीच्या एका शनिवारी चार-पाच कार्यकर्त्यांनी जाऊन गड पाहून यायचा असे ठरविले. प्रशांत भिरंगे , प्रशांत हिंगे बहुधा केदार लोणकर आणि मी असे आम्ही पुण्यातून चारजण संध्याकाळी लोकल ट्रेनने निघालो आणि लोणावळ्याला उतरलो तेथे थोडे खाऊन, चहा घेऊन चालायला सुरुवात केली. साधार...