Posts

Showing posts with the label ॲंगस मेडिसन

पाश्चात्त्यांचा श्रेष्ठत्वाचा अहंगंड

Image
        " सर्वज्ञ असलेल्या ईश्वराने संपूर्णपणे कृष्णवर्णीय शरीरात आत्मा आणि तोही अमर आत्मा घातला असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. .... हे लोक मनुष्य जातीत मोडतात ही गोष्ट अशक्य आहे." १८ व्या शतकातील फ्रेंच विचारवंत मॉन्टेस्क्यू (१६८९-१७५५) याचे हे अवतरण काही दिवसांपूर्वी वाचनात आले आणि मी सुन्न झालो. माणसाला माणूस म्हणण्याचे नाकारणारे हे विचार दुःखद आणि चीड आणणारे आहेत. मॉन्टेस्क्यू हा अतिश्रीमंत सरंजामदार  युरोपच्या प्रबोधन काळातील फ्रेंच विचारवंत होता. फ्रान्समधील तत्कालीन राजेशाहीच्या बेबंद कारभाराच्या पार्श्वभूमीवर देशाच्या कारभाराबद्दल त्याने महत्वाचे विचार मांडले. विशेषतः कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका हे तीनही स्वतंत्र विभाग असले पाहिजेत. त्यांचा एकमेकांच्या कामात हस्तक्षेप असता काम नये हा महत्त्वाचा विचार त्याने मांडला‌. परंतु फ्रेंचांना कृष्णवर्णीयांना गुलाम करून उसाच्या मळ्यांतून संपत्ती कशी मिळवता येईल याचे समर्थन करताना त्याने वरील निंदनीय विचार मांडले आणि वसाहती करण्यासाठी समर्थन देणारा युक्तिवाद पुरवला. ( जगातील वसाहतींचा नकाशा सौजन्...