पाण्याचा प्रश्न
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. यावर्षी सरासरीएवढा पाऊस पडेल असा अंदाज आहे. आपला भारत देश भाग्यवान आहे. कारण गेली हजारो वर्षे येथे मान्सूनचा पाऊस नियमितपणे पडतो. त्याच्या आधारावर शेती बहरली आणि जनजीवन स्थिर झाले. संपन्नता व समृद्धी आली. परंतु गेली काही वर्षे मान्सूनमध्ये बदल होताना आढळतो आहे. त्याचे प्रमाण, वितरण यामध्ये बदल जाणवू लागले आहेत. याचा परिणाम सहाजिकपणे जनजीवनावर होतो आहे. कारण जर पाणी पुरवठा सुरळीत असेल तरच जनजीवन फुलते म्हणून पाण्याला जीवन असेदेखील एक नाव आहे. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) पाण्याबाबत असे म्हटले जाते की पूर्वी माणूस सहजपणे नदीचे पाणी येऊ शकत होता वापरू शकत होता. नंतर परिस्थिती बदलत गेली आता बऱ्याच ठिकाणी विहिरीचे ,आडाचे पाणी प्यावे लागते. याचेच एक नवीन रूप बोअरवेलचे पाणी प्यावे लागते. हळूहळू आता बाटल्यांमधूनच पाणी प्यायचे ही पद्धत रूढ होताना दिसतेय. साधारणपणे पंचवीस तीस वर्षांपूर्वी याची कल्पना देखील कोणी केली नव्हती आता ती स्वाभाविक स्थिती झाल्याचे आपण अनुभवत आहोत. काही व...