Posts

Showing posts with the label गरवारे महाविद्यालय

सभागृहाच्या आठवणी...!

Image
 आज म.ए.सो.गरवारे महाविद्यालयाचे सभागृह पाडले गेले.२००५ मध्ये सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले. त्यावेळी या सभागृहासाठी सुयोग्य अशा संस्कृत ओळी संस्थेचे माजी विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे माजी प्रा.जे.पी. गद्रे यांनी लिहून दिल्या होत्या. त्या ओळींतील भावनांचा आशय व्यक्त करणाऱ्या पुढील ओळी या सभागृहासाठी प्रा.रामभाऊ डिंबळे यांनी लिहून दिल्या होत्या. पवित्रं प्रसन्नं गुणोत्कर्षकारी | इदं मंदिरं स्यात् वयःशक्तिपीठम् | त्या विद्यार्थ्यांना कलागुणांचा उत्कर्ष करण्यासाठी प्रेरणा देत होत्या. गेली जवळपास ७ दशके ज्या सभागृहाने विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्याचे व्यासपीठ दिले, विविध तज्ज्ञ ,विचारवंत, अभ्यासक यांची विद्वत्तापूर्ण भाषणे ऐकण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या, आपल्या कल्पना प्रकल्प रूपाने सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली, सामाजिक बांधिलकीतून चालणाऱ्या अनेक उपक्रमांचे ,घडामोडींचे, समारंभचे जे सभागृह साक्षीदार होते, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील दिग्गज गायकांनी ज्या मंचावरती आपली कला सादर केली तो मंच असलेले सभागृह आता काळाच्या पडद्याआड गेले आहे. आज तिथे उरला आहे फक्त ढिगा...

थोडी धडपड तहानलेल्यांसाठी...

Image
  एप्रिल २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आमच्या म.ए.सो.संस्थेच्या पुण्यातील शाखांनी दुष्काळ निवारण निधी गोळा करण्याचा कार्यक्रम ठरवला. आमच्या गरवारे महाविद्यालयानेदेखील त्यात सहभाग घेतला. तो आठवडाभर आम्ही सगळे त्या धावपळीत होतो. रस्त्यावर स्टॉल लावणे, पत्रके वाटणे, कॉलेजमध्ये वैयक्तिक भेटून, बैठकांमध्ये आवाहन करणे असे वेगवेगळया पद्धतीने प्रयत्न केले गेले.अनेकजण यामध्ये सहभागी झाले.रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांनी निधी कलशात टाकलेल्या पैशांपासून अनेकांनी आपणहून दिलेल्या रोख रकमा आणि धनादेशापर्यंत अनेक मार्गांनी निधी गोळा झाला. अनेक नवनवे अनुभव मिळाले. या आठवड्यातील कौटुंबिक समाधानाचा एक दिवस... दुष्काळग्रस्तांसाठी निधी संकलनाचा सप्ताह सुरू झाला. रात्री होस्टेलच्या मुलांबरोबर बसून स्टॉलच्या कामाचे नियोजन केले. जवळपास ६-७ तास त्या कामात गेले. या कामात नियोजनापासून ते स्टॉलच्या कामात माझी पत्नी सौ.शैलजा आणि मुलगा शंतनू यांचा सक्रीय सहभाग होता. स्टॉलच्या कामात तर त्यांनी भाग घेतलाच पण त्याचबरोबर दोघांनीही आपापल्या पैशातून दुष्काळग्रस्त...

सामाजिक जाणिवेतून...

Image
    २०१३ हे स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीचे वर्ष. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या वतीने दरवर्षी भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा घेतली जाते आणि त्यातून स्वामीजींचे कार्य युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.२०१२ पासूनच आमच्या म.ए.सो.गरवारे महाविद्यालयातील तसेच म.ए.सो. वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी यात सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न केले. या परीक्षेत वसतिगृहातील अनेक मुला-मुलींनी भाग घेतला. त्याच बरोबर स्वामीजींचे जीवन व कार्य वसतिगृहाच्या सर्व मुला-मुलींना समजावे यासाठी स्वामीजींच्या जन्मदिनी २०१२ मध्ये दामोदर रामदासी यांचा स्वामीजींच्या जीवनावरील एकपात्री प्रयोग,  २०१३ मध्ये  कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे  कीर्तन ,तर २०१४ मध्ये शाहीर बापू पवार यांचे पोवाडा गायन या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. हे सगळे कार्यक्रम करत असताना मुला मुलींच्या विचारांना चालना मिळत होती.  २०१५ मध्ये देखील या परीक्षेला मुलेमुली बसली होती. त्यानंतर एके दिवशी रात्री मी या मुला-मुलींशी बोललो. स्वामीजींचा कोणता विचार सगळ्यात महत्त्वाचा वाटतो यावर मनमोकळी च...

दुखणे मनाचे...

Image
" आज विद्यापीठाला हलवून टाकल," समीर ( नाव बदललं आहे.) बोलत होता . परत परत तेच सांगत होता. साधारण १२/१३ वर्षांपूर्वीचा प्रसंग समीर विदर्भातील एक हुशार मुलगा, बारावीच्या परीक्षेत थोड्या आजारपणामुळे गुण कमी मिळाले आणि मनाचं दुखणं सुरू झालं. पदवीसाठी एक वर्ष गावाकडे काढलं. पण त्याच्यापुढच्या वर्षी म. ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालयात परत पदवीच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतला. त्याच्या कुटुंबात आई आणि वीज महामंडळात काम करणारा मोठा भाऊ होता. समीरच्या प्रवेशाच्या वेळी त्याचं दुखणं लक्षात घेऊन त्याच्या भावाशी चर्चा केली आणि त्याची हमी घेऊन समीरला प्रवेश दिला. वर्षभर समीर अगदी व्यवस्थित होता. वसतिगृहाच्या कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी झाला. मित्र मैत्रिणींचा चांगला गटही तयार झाला होता. पुण्यातील एका प्रसिद्ध मानस उपचार तज्ञ डॉक्टरांशी डॉक्टरांचे उपचार देखील चालू होते. वर्षाच्या शेवटी परीक्षा जवळ आली. तसा समीरच्या मनावर ताण वाढत गेला. लेखी परीक्षेला गेला त्यावेळी तो ताण असह्य झाला आणि त्याने तिथे अनियंत्रित वर्तन केले. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्याकडून मला याची माहिती मिळाली पण त्या...