Posts

Showing posts with the label इंटरनेट

आव्हान

  "सर, आमची एनर्जी कशी चॅनलाइज करायची हे आमच्या जनरेशन पुढे मोठं चॅलेंज आहे." एके दिवशी मी विद्यार्थ्यांशी बोलत होतो की त्यांना कोणती आव्हाने आहेत असे वाटते. यावर २-३ जणांनी वेगवेगळी उत्तरे दिली आणि एका विद्यार्थ्याने 'एनर्जी कशी चॅनलाइज करायची हे आव्हान वाटते' असे उत्तर दिले. मी त्याला विचारले की ," असं तू का म्हणतोस?" त्यावर त्यांनं सांगितलं, "ऑटोमायझेशन सुरू झाल्यापासून माणसाचे आयुष्य दिवसेंदिवस अधिक इझी होत चालले आहे. पूर्वी ज्या गोष्टींना खूप कष्ट करावे लागायचे त्या गोष्टी आता सहज सोप्या बनल्या आहेत. दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी अधिकाधिक प्रगत होत चालली आहे. त्यामुळे अनेक गोष्टी ज्याला इंग्रजीत 'ऑन द फिंगर टिप्स ' म्हणतात अशा झाल्या आहेत. उदाहरणार्थ पूर्वीच्या काळी जर रेल्वेचे रिझर्वेशन करायचे असेल तर प्रत्यक्ष जाऊन रांगेत उभे राहून ते करावे लागायचे. यात खूप वेळ आणि श्रम खर्ची पडायचे. पण आता इंटरनेटच्या माध्यमातून ते सहज होते. तसेच इतर अनेक गोष्टींबद्दल सांगता येईल. त्यामुळे जी एनर्जी तरुणांच्यात‌ असते ती या प्रकारच्या गोष्टींमध्ये खर्च होत नाही....