Posts

Showing posts with the label सूर्यनमस्कार

आचार्य अत्रे यांची सत्यकथांवर आधारित काही नाटके

Image
      तत्कालीन कवींवर लिहिलेल्या विडंबन कविता आचार्य अत्रे यांनी 'झेंडूची फुले' या पुस्तकात प्रसिद्ध केल्या. यामुळे हळूहळू साहित्य क्षेत्रात त्यांची कीर्ती वाढू लागली. आचार्य अत्रे हे राम गणेश गडकरी यांच्या प्रभावाखाली तयार झाले होते. गडकरी स्मृतिदिनाची अत्रे यांनी केलेली भाषणे,  अत्रे यांचे शाळेतील प्रयोग, त्यांचे लंडनला जाऊन शिक्षणशास्त्र शिकून येणे,  ठिकठिकाणी वेगवेगळ्या विषयावर भाषणे करणे यामुळे आचार्य अत्रे प्रसिद्धीच्या झोतात आले होते.  ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       १९३३ मध्ये एके दिवशी त्या वेळच्या बालमोहन नाटक मंडळीचे प्रमुख दामू अण्णा जोशी आचार्य अत्रे यांच्याकडे आले. अत्रे यांनी नाटक लिहावे असा यांनी आग्रह धरला. अत्रे यांनी तोपर्यंत व्यावसायिक नाटक लिहिलेले नव्हते. परंतु दामू अण्णा जोशी यांच्या आग्रहामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात आचार्य यात्रे यांचा प्रवेश झाला. स्वतःच्या प्रतिभेने आचार्य अत्रे यांनी अनेक नाटके लिहिली‌. ती खूप लोकप्रिय ठरली. त्यामुळे त्यांना एक प्रसिद्ध नाटककार म्हणूनदेखील ...

पी.टी.

Image
       "आपला पाल्य वसतिगृहातील सक्तीचा व्यायाम करण्यास तयार आहे का?" गेली अनेक वर्षे म.ए.सो.महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रवेश अर्जावर हा प्रश्न लिहिलेला असतो. सर्व विद्यार्थी हो असा पर्याय निवडून प्रवेश घेतात. मग एका नवीन अनुभवाला सामोरे जातात.        साधारण २५-२६ वर्षांपूर्वी त्यावेळचे वसतिगृहप्रमुख प्रा.र.वि.कुलकर्णी सरांनी हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम वसतिगृहात सुरू केला. आयुष्याच्या धकाधकीला सामोरे जाण्यासाठी शारीरिक क्षमता प्राप्त करून घेणे अतिशय आवश्यक आहे. या कल्पनेने शारीरिक क्षमता जोपासावी या हेतूने हा उपक्रम सुरू झाला. सकाळी ६ ते ६:३० या वेळात महाविद्यालयाच्या सत्रात अध्यापन सुरू असताना सक्तीच्या व्यायामाचा हा उपक्रम घेतला जातो. याच्या अंमलबजावणीमध्ये मुला-मुलींना सहभागी करून घेतले जाते. मुलांचा आणि मुलींची पी.टी.लीडर यांची निवड केली जाते. त्यांच्यावर पी.टी.घेण्याची जबाबदारी सोपवली जाते. कुलकर्णी सर , उमराणी सर यांच्यासोबत मी आणि आता मी आणि  डॉ.विनायक पवार सर मुलांच्या बरोबर मैदानावर असतो. महाविद्यालयाच्या मैदानावर पळत -चालत...