भारतीयांच्या बदललेल्या सवयी
आपल्या प्राचीन देशात अनेक सवयी, पद्धती हजारो वर्षापासून चालत आलेल्या आहेत. परंतु गेल्या काही काळात या पद्धतींमध्ये बदल झालेले पाहायला मिळतात अशा काही बदलांचा विचार आपण करूयात. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार) एखादी व्यक्ती भेटल्यानंतर तिला हात जोडून नमस्कार करणे ही आपली भारतीय पद्धत आहे. परंतु पाश्चात त्यांच्या विशेषतः इंग्रजांच्या प्रभावामुळे आता हस्तांदोलन हे सर्रास रूढ झाले आहे. हस्तांदोलन केले नाही तर आपण त्या व्यक्तीचा सन्मान केला नाही असेदेखील काही जणांना वाटते. वेगळा मुद्दा म्हणजे कोरोना काळात हस्तांदोलन टाळा असे सांगितले जात होते. अभिवादन करण्याच्या विविध पद्धती भारतात प्रचलित आहेत. त्यातील भेटलेल्या माणसाला राम राम म्हणणे ही पद्धत बहुदा सर्वात जास्त प्रचलित आहे. परंतु आता याची जागा विशेषतः तरुण पिढीमध्ये हाय हॅलो या शब्दांनी घेतल्याचे दिसून येते. मी ११-१२ वीत शिकत असताना माझ्या एका मित्राने त्याच्या दुसऱ्या एका मित्राची एकदा ओळख करून दिली. त्याला मी नमस्कार म्हणालो तर त्या दोघांनाही ते ...