भाषा - शब्द शिकण्याचे माझे प्रयत्न..
"તને ગુજરાતી આવડે છે?"(तने गुजराती आवडे छे के?) असं समोरच्याने विचारले. मी विचार करू लागलो की गुजराती भाषा अजून आपल्याला येत नाही मग ती आवडणार कशी? मला लहानपणापासून वेगवेगळ्या भाषा , शब्द शिकायला आवडते. माझ्या आठवणीप्रमाणे आमचा शाळेतील मित्र शेखर जगताप याच्याकडे मी शाळेत असताना भाषांचं एक पुस्तक बघितलं होतं. त्यात अनेक भारतीय भाषांमधील सोपी छोटी वाक्ये दिली होती. ते पुस्तक वाचून मला काही वाक्ये लक्षात राहिल्याचं आठवतं. कन्नड भाषेतील ' येनु' म्हणजे ' काय रे?' , 'येन री ?' म्हणजे ' काय हो?' ही वाक्ये लक्षात राहिली. नंतर १९९०-९४ या वर्षात साताऱ्यात शिकायला होतो. तेव्हा शूर्पाली काकू यांच्याकडे काही महिने जेवायला आम्ही काही मित्र जात असू. तेव्हा आणखी काही कानडी शब्द शिकायला मिळाले. "नीर बेकु" म्हणजे पाणी हवं आहे, "मजगी हाकरी" "ताक वाढा" . माझी सासुरवाडी सोलापूर. त्यामुळे लग्नानंतर, 'बर्री' म्हणजे 'या' , ' बर्तिनी' म्हणजे 'येतो' या शब्दांची उजळणी झाली. साताऱ्यात असतानाच मी काही महिने साल...