Posts

Showing posts with the label खेतडी संस्थान

स्वामी विवेकानंद प्रेरणादायक प्रसंग

Image
  भारतभूमीचे थोर सुपुत्र विवेकानंद यांचे संपूर्ण जीवन प्रेरणादायक आहे. त्यातील दोन प्रसंग स्वामीजी शिकागोला सर्व धर्म परिषदेसाठी जाणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांचे शिष्य खेतडी संस्थानचे अधिपती महाराज अजित सिंह यांनी आपल्या जयपूर येथील वाड्यात स्वामीजींच्या मनोरंजनासाठी दरबारातील गायिकेचे गायन ठेवले. पूर्ण स्वामीजींच्या मनात आले की आपण तर सर्वसंग परित्यागी संन्यासी आहोत. आपण पोटासाठी गाणे म्हणणाऱ्या गायिकेचे गाणे का ऐकायचे? त्यामुळे ते गाण्याच्या कार्यक्रमाला गेले नाहीत. स्वामीजींसारख्या महापुरुषाची सेवा म्हणून गाणे म्हणू इच्छिणाऱ्या गायिकेला खूप वाईट वाटले. तिने भावपूर्ण स्वरात संत सूरदास यांचे पद म्हटले "प्रभु मोरे अवगुण चित ना धरो समदरसी है नाम तीहारो चाहे तो पार करो". गायिकेचे हे आर्त स्वरातील गाणे ऐकल्यानंतर स्वामीजींना आपली चूक कळून आली आणि त्यांनी लगेच जाऊन हात जोडून तिची क्षमा मागितली. प्रत्येकातील परमेश्वर बघायला शिकले पाहिजे ही गुरूंची शिकवण त्यांनी आता पूर्णपणे आत्मसात केली. नंतर आपल्या शिष्यांना स्वामीजी हा प्रसंग वारंवार सांगत. कदा चूक कार्यात हातून झाली अशी बां...