Posts

Showing posts with the label कविवर्य मोरोपंत

सर्वांगीण विचार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

Image
     १३ ऑगस्ट हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा स्मृतिदिन. या महान विभूतीबद्दल जसजशी अधिक माहिती होत जाते. तसतसे आपण अधिकच भारावून जातो. सर्वांगीण विचार करणाऱ्या अहिल्याबाई यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारे हे काही प्रसंग.  ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )         मध्ययुगीन काळामध्ये जंगल भागात असणारा दरोडेखोरांचा वावर आणि त्यांच्याकडून होणारी लूट हे प्रकार साधारणपणे नित्याचेच म्हणता येतील. इंदूरजवळच्या जंगलात दरोडेखोरांनी एका वाटसरूला पकडले. त्याच्याकडची चीजवस्तू लुटून घेतली आणि त्याला झाडाला बांधून ते पळून जाऊ लागले. दरोडेखोर आपल्याला बांधून पळून जाताहेत हे पाहताच त्या वाटसरूने सुरेल आवाजात गाणं म्हणायला सुरुवात केली. त्याच्या आवाजाचा प्रभाव पडून दरोडेखोर माघारी आले. त्यांनी त्याला सोडवले आणि विचारले की, " तू कुठे चालला आहे?" तर त्याने सांगितले की, " मी अहिल्याबाई होळकर यांना भेटायला चाललो आहे." हे ऐकताच येताच दरोडेखोर चपापले आणि त्या प्रवाशाला सोबत घेऊन ते मातोश्री अहिल्याबाई यांच्या भेटीला आले. अहिल्याबाई यांनी या वाटसरूची ओळख करून घेतल...