Posts

Showing posts with the label छ.शिवाजी महाराज

शिवनेरीवरील माझा भाग्ययोग

Image
         उत्सव बहु थोर झाला, भाग्ययोग अनुभवला "सुधीरजी, यावर्षी शिवनेरीवर तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंती उत्सवाला वक्ते म्हणून येणार ना?" काही दिवसांपूर्वीच आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांचा फोन आला. गेल्या वर्षीही त्यांनी निमंत्रण दिले होते पण काही अडचणींमुळे मला जायला जमले नव्हते. पण यावर्षी मात्र तो योग आला.      श्री शिवनेरी स्मारक समिती पुणे यांच्या वतीने गेल्या ४६ वर्षांपासून फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. त्याकाळी शिवजयंतीची तिथी वैशाख शुद्ध द्वितीया जास्त प्रचलित होती. पण त्यावेळी नव्याने उजेडात आलेल्या पराव्यांनुसार फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी मान्य झाली. ह्या उत्सवाची परंपरा सुरू झाली. राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर काम करणाऱ्या अनेक महनीय व्यक्ती या उत्सवासाठी येऊन गेल्या आहेत. यावर्षी हा भाग्ययोग मला अनुवयला मिळाला. ग्राहक चळवळीचे पहिल्या पिढीतील कार्यकर्ते कै.बिंदुमाधव जोशी आणि कै. शाहीर हिंगे यांनी या उत्सवाची सुरुवात आपल्या सहकाऱ्यांसह केली होती. हीच परंपरा आजही जपली गेली आहे.         शाह...

छ. शिवराय : न्यायप्रियता

Image
        मध्ययुगीन काळात राज्यकारभार करणाऱ्या व्यक्तिकडे न्यायनिवाडा करण्याचेही काम असे. अनेकवेळा न्यायनिवाडा करताना त्यात भेदभाव झाल्याचीही उदाहरणे इतिहासात नोंदवलेली आढळतात. काही प्रसंगी न्यायदान करताना लहरीपणाचाही परिणाम झाल्याचे दिसून येते. राज्यकर्त्याचे न्यायदानाचे काम कसे चालले आहे यावर त्याच्या राज्यकारभाराचीही गुणवत्ता दिसून येते. याबाबत छ. शिवाजी महाराजांचे उदाहरण आदर्शवत असे आहे.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        छ. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची न्यायप्रिय वृत्ती! न्यायदान चोख करण्यासाठी त्यांच्या काळी वेगवेगळ्या पद्धती होत्या. त्यामधील एक म्हणजे दिव्य करणे. यामध्ये उकळत्या तेलातून काही वस्तू काढणे किंवा पाण्याखाली ठराविक काळ श्वास रोखून बसणे अशा पद्धती होत्या. शिवराय अशा काही दिव्य करण्याच्या प्रसंगी उपस्थित राहिल्याचे इतिहासात नोंदवले गेले आहे.        १६४२ मध्ये राजमाता जिजाऊ साहेबांच्याबरोबर बाल शिवराय पुण्यात आले. तेव्हा पुण्यात राहण्यासाठी ...

छ. शिवराय : चौकस वृत्ती

Image
     जगात सर्वात जुनी संस्कृती असलेला आणि ऐतिहासिक काळाच्या सुरुवातीला ( सन १ पासून किंवा त्याच्या आधीपासून) संपन्न असा भारत देश होता. पण नंतरच्या काळात भारताचे पतन का झाले याची वेगवेगळी कारणे वेगवेगळ्या व्यक्तींनी दिली आहेत. ही सर्व कारणे खरोखर विचार करायला लावणारी आहेत. त्यातील स्वामी विवेकानंदांनी एक निराळेच कारण दिले आहे. " जगावाचून आपले काही अडणार नाही या वृत्तीमुळे भारत स्वतःतच गुंतून राहिला. बाहेर काय चालले आहे इकडे भारतीयांनी लक्ष दिले नाही . त्यामुळे भारताचे पतन झाले." असे स्वामीजींनी म्हटले आहे. अशाच प्रकारची नोंद छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेक प्रसंगी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेल्या हेन्री ऑक्झिंडेन याने केली आहे. त्याने ३० मे १६७४ ला जे पत्र कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाठवले आहे त्यात  इंग्लिश आरमाराने डच आरमारावर विजय मिळवला ह्या बातमीबाबत तो लिहितो , "  परदेशातील राजकारणाकडे लक्ष देणारे किंवा परदेशी राजांच्या उदयास्ताचा विचार करणारे जर कोणी या प्रांतात असते तर ही आनंदाची बातमी प्रसिद्ध केली असती परंतु परदेशातील यशापयशाची...

छ. शिवराय आणि इंग्रजांचा दुभाषा

Image
     छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजाभिषेक ही केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील एक विलक्षण घटना होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा माणसांना गुलाम न करण्याविषयीचा आग्रह लक्षात घेतला तर ती एक वैश्विक पातळीवरील देखील महत्त्वाची घटना होती. हिंदवी स्वराज्याशी संबंधित महत्त्वाची मंडळी त्या प्रसंगाला उपस्थित होती. ते भाग्य त्या सर्वांना लाभले. याच भाग्याचा एक अवचित धनी ठरलेला भारतीय माणूस होता तो म्हणजे नारायण शेणवी! ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने व्यापार विषयक करार करण्यासाठी हेन्री ऑक्झिंडेन या प्रसंगापूर्वीच रायगडावर म्हणजेच पाचाड येथे १८ मे १६७४ ला दाखल झाला होता. महाराजांची आणि इतर मंत्रीगणाशी संवाद साधण्यासाठी दुभाषाची आवश्यकता होती. त्यामुळे नारायण शेणवी हा दुभाषा म्हणून उपस्थित होता. राजाभिषेकाची गडबड चालू असल्यामुळे व्यापार विषयक करार करणे लांबत गेले आणि या दोघांनाही रायगडावर राहणे क्रमप्राप्त प्राप्त झाले. या गडबडीतही २६ मे १६७४ ला महाराज आणि शंभूराजे यांची भेट या मंडळींना मिळाली. परंतु करार मात्र पूर्ण झाला नाही.  ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्य...

छ. शिवराय : तीन गुण

Image
       छत्रपती शिवाजी महाराजांच्यासारखे व्यक्तिमत्व हजारो वर्षातून एकदा जन्माला येते. जनसामान्यांना आश्चर्यचकीत करून सोडणारे अद्भुत जीवन जगून जाते. त्यांचे आयुष्य जणू चमत्कारच भासतो. चमत्काराला नमस्कार करण्याची स्वाभाविक मानवी वृत्ती असल्यामुळे जयजयकार हा मुखातून आपसूक उमटतो आणि घोषणा बाहेर पडते, छत्रपती शिवाजी महाराज की जय!  परंतु सामान्य व्यक्तीकडे रोजच्या आयुष्यात शिवाजी महाराजांच्यासारखे धैर्य ,युक्ती ,बुद्धी अभिनव कल्पना , उत्तुंग ध्येय या आणि अशा अनेक गुणांसारखे गुण आचरणात आणण्याची संधी सहसा मिळत नाही. परंतु शिवरायांचे काही गुण असे आहेत की जे सर्वांना रोज आचरणात आणता येतील.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        यापैकी पहिला गुण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी धार्मिक वृत्ती! अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी साक्षात् भवानी मातेचा दृष्टांत आपल्याला झाला आहे या उद्गारांनी त्यांनी आपल्या सवंगड्यांना प्रेरित केले. देशभर ज्याच्या पराक्रमाची क्रौर्याची कीर्ती होती त्या अफजलखानाला यमसदनाला पाठवून स्वराज्या...

छ. शिवराय: दुर्दम्य इच्छाशक्ती

Image
        स्वतःच्या कर्तृत्वाने अजरामर झालेल्या छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्वाचे किती वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या गुणांचे वर्णन करण्यासाठी शब्ददेखील अपुरे पडतात! त्यांच्या जीवनाबाबत विचार करताना वेगवेगळे मुद्दे समोर येतात. त्यांच्या यशस्वी युगप्रवर्तक जीवनाची गुरुकिल्ली कोणती? असे म्हटले तर अनेक उत्तरे बरोबर असू शकतात. परंतु त्यांची जी दुर्दम्य इच्छाशक्ती होती ती कधीही क्षीण झाली नाही! त्यामुळे प्रसंग कोणताही असो त्या प्रसंगात अभिनव विचार करून त्यांनी मार्ग काढला असे लक्षात येते.    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )         अगदी बालवयातच हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेऊन वचनबद्ध झालेल्या शिवरायांनी आपल्या प्रदेशाचा विस्तार करण्याचे धोरण अमलात आणले. तत्कालीन महाराष्ट्रावर विजापूरच्या आदिलशहाचा जवळपास एकछत्री अंमल होता. त्यामुळे त्याच्या नजरेतून ही गोष्ट सुटणे शक्य नव्हते. त्याच्या सत्तेला दिले गेलेले हे आव्हान तो दुर्लक्षित करेल हे देखील शक्य नव्हते. त्यामुळे शिवरायांवरती दबाव आणावा या हेतूने शहाजीराजांना कपटाने कैद करण्यात ...

जादूटोणा ?!

Image
     जगामध्ये चमत्कार, जादूटोणा यांची खूप चर्चा होत असते. आहेत की नाहीत अशा दोन्ही बाजूंनी भरपूर सांगितले जाते. परंतु जगभर याप्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. जनमानसावर त्याचा विलक्षण पगडा असतो. विशेषतः ऐतिहासिक काळात तर याबाबत बरेच गूढ वातावरण होते. इतके की  एका माहितीनुसार युरोपमध्ये चौदावे ते अठरावे शतक या मध्ययुगीन काळात हजारो जणांवर खटले चालवले गेले . त्यातील अनेकांना दोषी ठरवून जिवंत जाळणे, शिरच्छेद किंवा फाशी अशा शिक्षा देण्यात आल्या. भारतातही गौड बंगाल, काळी जादू, जादूटोणा, भानामती या नावांनी अशा गोष्टी प्रचलित आहेत.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       सध्याचे हिंदी भाषेतील आघाडीचे लेखक, चित्रपट कथाकार श्री.अक्षत गुप्ता यांच्या काही मुलाखती नुकत्याच ऐकल्या. त्यामध्ये त्यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगितला. २०१४ पासून त्यांच्या आयुष्यात अनेक उलथापालथी झाल्या. घटस्फोट झाला,‌ चांगला चालत असलेला हॉटेल व्यवसाय नुकसानीत गेला, अपघात झाला,‌आत्महत्येचाही अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या धाकट्या भावाने यावर त...

छ. शिवराय : चिरकालासाठी प्रेरणास्रोत

Image
   "शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला | दहा दिशांच्या हृदयामधुनि अरुणोदय झाला || "   ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ! हीच आहे ती पवित्र मंगल प्रेरणादायक तिथी! संवत्सर होते आनंद नाम संवत्सर आणि शालिवाहन शके १५९६.  ग्रेगरियन कॅलेंडरनुसार दिनांक होता ६ जून १६७४. ( यावर्षी हा दिनांक २० जून २०२४ हा आहे.) याच दिवशी शिवराय सिंहासनाधीश्वर झाले. वेदमंत्रघोषात त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने राज्याभिषेक करण्यात आला. या पवित्र भारतभूमीचे भाग्य पुनरपि उदयाला यावे हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून जो अविरत संघर्ष चालला होता त्याचा जणू हा सुवर्णबिंदूच!    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)    छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व, चरित्र, कर्तृत्व, विचार हे चिरकाल प्रेरणा देणारे आहे. शिवरायांनी जे ध्येय ठरवले होते ते केवळ महाराष्ट्र या भौगोलिक प्रदेशापुरते सीमित नव्हते तर त्यामागे अखिल भारतीय दृष्टिकोन होता. हा दृष्टिकोन आपल्याला शिकवतो की ध्येय नेहमी उत्तुंग ठेवा. परिश्रमांची पराकाष्ठा करा. कल्पकता नाविन्याची कास धरा. हे सर्व गुण सर्व कालात अनुकरणीय आहेत.    मध्ययुगातील धर...

सश्रद्ध शिवराय

Image
     छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे सश्रद्धपण! ईश्वरी अस्तित्वावरती , त्याच्या सगुण साकार रूपांवर महाराजांची निरतिशय श्रद्धा होती.              ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )         आपले कार्य हे ईश्वरी कार्य आहे याच्यावर महाराजांची अभंग श्रद्धा अगदी लहानपणापासून होती. १६४५ मध्ये दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांचे अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणजे , "हे राज्य व्हावे असे श्रींचे मनात फार आहे. पुढे हिंदवी स्वराज्य स्थापन करून तो आम्हास यश देणार आहे." यावेळी शिवराय फक्त पंधरा वर्षांचे होते हे लक्षात घेतले पाहिजे. परंतु इतक्या लहान वयातच त्यांना आपल्या ईश्वरी कार्याचा साक्षात्कार झाला होता आणि ईश्वरी कृपेने हे कार्य सिद्धीस जाणार आहे यावर त्यांची ठाम श्रद्धा होती हे सहजपणे समजते.       अफजलखानाचे स्वराज्यावरील आक्रमण प्राणांतिक संकट होते. यावेळी वय, अनुभव, फौजफाटा, धनसंपत्ती या सर्वात शिवराय तुलनेने कमी होते हे लक...

छ. शिवराय : अखिल भारतीय दृष्टी

Image
     भारताचा मध्ययुगीन इतिहास लिहिताना तुर्क, पठाण, मोगल, इंग्रज, फ्रेंच इत्यादी लुटारू आक्रमकांच्या दृष्टीने लिहिला गेल्याचे आढळते. त्यामुळे ही तत्कालीन आक्रमक मंडळी छ. शिवाजी महाराजांना बंडखोर, लुटारू अशी विशेषणे वापरत असत. जणू काही ते स्वतःच इथले मालक आहेत असा हा आविर्भाव. चोराच्या उलट्या बोंबा त्या ह्याच! छत्रपती शिवरायांचा लढा हा भूमिपुत्रांचा लढा असून तो स्वातंत्र्यलढा आहे ही भूमिका त्यांनी कधीच मान्य केलेली दिसत नाही. तसेच महाराजांचे विचार, दृष्टी महाराष्ट्रपुरती किंबहुना त्यांच्या ताब्यात असलेल्या महाराष्ट्राच्या, तामिळनाडूच्या आणि कर्नाटकाच्या काही भूमिपुरती मर्यादित होती अशीदेखील समजूत दिसते.             ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)  परंतु महाराजांची दृष्टी ही केवळ आपल्या ताब्यातील भूप्रदेशाएवढीच मर्यादित नव्हती तर ती अखिल भारतीय होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे. याचे अनेक पुरावे देता येतील. ॲबे बार्तुलमी कॅरे नावाचा एक युरोपियन प्रवासी शिवाजी महाराजांच्या जीवित काळात दोन वेळा भारतात प्रवास करण्यासाठी आला होता. त्याने आपल्या आ...

छ.शिवराय : गुणीजनांचे आश्रयस्थान

Image
       छ.शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यात अतिशय प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या कर्तृत्वाची माहिती जसजशी पसरत गेली तसतसे अनेक ठिकाणांहून गुणीजन आणि निष्ठावंत शिवरायांकडे आकर्षित झाले‌. यामध्ये सर्व स्तरातील लोक होते. बुद्धिमंत, कलावंत, सामान्य जन सर्वचजण स्वराज्याकडे खेचले गेले. महाराजांपाशी आपल्या कलागुणांचे चीज होईल, निष्ठेची कदर होईल अशी सर्वांना खात्री होती. त्यापैकी काही उदाहरणे पाहूया.        अफजलखानाच्या वधानंतर सुमारे १८ दिवसांत नोव्हेंबर १६५९ मध्ये महाराजांनी प्रतापगडापासून ते पन्हाळ्यापर्यंत स्वतः विस्तार केला. या परिसरातील जनतेला शिवरायांच्या आचार विचार आणि धोरणामधील वेगळेपण, सच्चेपण भावले. यातच एक होते पन्हाळ्याजवळील नेबापूरचे शिवा काशीद. लोकांचे केशकर्तन उपजीविका करणाऱ्या काशीदांचे अनोखेपण म्हणजे ते शिवरायांसारखे दिसत. शिवरायांचा आणि काशीदांचा सहवास जेमतेम ६-७ महिन्यांचा. परंतु मोक्याच्या वेळी प्राण जाण्याची खात्री असतानाही शिवरायांची वेशभूषा करून ते सिद्दी जौहरला चकवा देण्याच्या प्रयत्नात सहभागी झाले आणि शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी आत्...

छ.शिवराय : हिंदुंवरील आक्रमणाचा प्रतिकार

Image
  मध्ययुगीन काळातील मुस्लिम व ख्रिश्चन शासकांचा हेतू केवळ राज्य जिंकणे व संपत्तीची लूट करणे एवढेच होते असे मानणे भाबडेपणा ठरेल. धर्मप्रसार हा या राज्यकर्त्यांचा एक हेतू होताच. यासाठी अनेक क्रूर प्रकार केले जात. याची काही मोजकी उदाहरणे पाहूया.  फ्रेंच प्रवासी ताव्हेर्निये लिहितो,  " कालाबाग हे एक मोठे गाव आहे आणि येथे पुर्वी मुघल बादशहाला खंडणी देणारा एक मोठा राजा रहात असे. येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांकडून आणि व्यापाऱ्यांकडून तो मोठ्या प्रमाणावर लूट गोळा करीत असे, परंतु औरंगजेब राज्यावर आल्यानंतर त्याने या राजाचा आणि त्याच्या बऱ्याचशा प्रजेचाही शिरच्छेद केला. गावातील मुख्य रस्त्यांच्या नजीक असंख्य खिडक्यांचे मनोरे बांधून प्रत्येक खिडकीवर ठार मारलेल्या माणसाचे डोके ठेवले आहे. प्रत्येक दोन फुटांवर एक-एक डोके याप्रमाणे ही डोकी सर्व मनोऱ्यावर लावून ठेवण्यात आली आहेत. माझ्या मागच्या प्रवासाच्या वेळेस म्हणजेच सन १६६५ रोजी मी कालाबागवरून गेलो तेव्हा हे हत्याकांड होऊन फार दिवस झाले नसावेत , कारण त्यावेळेस ही डोकी शाबूत होती आणि त्यातून अत्यंत घाणेरडा दर्प येत होता."    ...

छ.शिवराय : शेती व महसूलविषयक धोरण

Image
       " महसूल न्यून होणे ही राज्याची सीर्णता. तो राज्यलक्ष्मीचा पराभव" असे वाक्य ऐतिहासिक साधनात वाचायला मिळते. त्यामुळे मध्ययुगात शेतीपासून जास्तीत जास्त महसूल मिळवणे हेच राज्यकर्त्यांचे धोरण असे.  ( लाल महालातील शिल्प इंटरनेटवरून साभार )          शिवाजी महाराजांचे धोरण पाहण्यापूर्वी तत्कालीन अन्य राज्यकर्ते मोगल, आदिलशाह निजामशाह, कुतुबशाह यांचे धोरण पाहिले पाहिजे. या सर्वांच्या राज्यांमध्ये शेतीवर ६० % कर आकारणी होत असे. त्यामुळे लागवडीचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत खाली घसरले होते. तसेच जे शेतकरी सारा देऊ शकत नसत अशांवर पाशवी अत्याचार होत असत. त्यांची मुंडकी तोडून त्यांचे मिनार रचले जात असत. शिर नसलेली धडे झाडांना टांगली जात. पीटर मुंडी या इंग्लिश प्रवाशाने पाटणा ते आग्रा या प्रवासात जे मुंडक्यांचे मिनार पाहिले त्यातील मुंडक्यांची मोजदाद करून आठ हजार मुंडकी पाहिल्याचे लिहून ठेवले आहे. मुघलांचा मनसबदार अब्दुल्ला फिरोजजंग बहादूर याने १६३२ मध्ये स्वतःच लिहून ठेवले आहे की मी दोन लाख शेतकऱ्यांना ठार मारले आहे. औरंगजेबाने गुजरातचा सुभेदार १६...

छ.शिवराय : व्यापाराबाबतची दूरदृष्टी

Image
        मध्ययुगीन काळात शेती व व्यापारावरील कर हेच महसुलाचे मुख्य साधन होते. यासाठी व्यापारी , सावकार यांचे राज्यकर्त्यांना महत्त्व वाटत असे. याबाबत शिवाजी महाराजांचे धोरण काय होते हे काही उदाहरणांवरून लक्षात येते.       ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)      पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी इंग्रजांनी केलेल्या आतताईपणामुळे इंग्रजांचा एकूण दृष्टिकोन, व्यवहार शिवरायांनी चांगलाच ओळखला होता ते ओळखून त्यांच्याशी ते व्यवहार करत होते. याचेच एक विलक्षण उदाहरण आहे. राज्याभिषेकानंतर महाराजांनी इंग्रजांच्याकडून मोठ्या प्रमाणात तांबे विकत घेतले. आता व्यवहार पूर्ण करायचा तर याचे पैसे द्यायला हवेत. परंतु रायगडावर सद्यस्थितीत रोख रक्कम पुरेशी नाही. त्यामुळे तुम्हाला गोवळकोंड्याची हुंडी देतो. ती तेथे जाऊन वटवा आणि पैसे घ्या असे महाराजांनी सांगितले. हुंडी घेऊन इंग्रजांचा माणूस रायगडावरवरून निघाला आणि मुंबईला पोचला. त्या काळात प्रवासाची साधने म्हणजे घोडा , पालखी इत्यादी असल्यामुळे एकूण प्रवासाला खूप वेळ लागत असे. इंग्रजांच्या त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे सर...

छ.शिवराय : स्वामिनिष्ठांचा प्रामाणिकपणा

Image
  छ. शिवाजी महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांनी उभी केलेली स्वामिनिष्ठांची मांदियाळी.‌ स्वराज्याच्या कामासाठी सर्व प्रकारचा त्याग करायला तयार असणारे हजारो लोक त्यांनी उभे केले. यामध्ये " आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे" असे म्हणणारे तानाजी मालुसरे आहेत. " तोफेआधी मरे न बाजी सांगा मृत्यूला" असं म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे आहेत. ' मातेस्तव धडही लढते संग्रामात ' असं ज्यांच्या आवेशाचं वर्णन केलं जातं ते मुरार बाजी देशपांडे आहेत. महाराजांच्या आज्ञेसरशी आखाड्यात उतरून पिसाळलेल्या हत्तीशी झुंज घेऊन त्याला लोळवणारे येसाजी कंक आहेत. अशी कितीतरी नावे सांगता येतील. अशी कणखर मनाची माणसे शिवरायांनी उभी केली. त्यांच्याबद्दल म्हणता येईल की, ' कालगतीहून बलवत्तर ही पौरूषशाली मने, याच मनांच्या अमित बलावर लाख झुंजवू रणे".           ‌( छायाचित्र सौजन्य अपूर्व सुरवसे )     या सगळ्यांचे वैशिष्ट्य असे की त्यांचा पराक्रम, कर्तृत्व ते शिवरायांना सांगायचेच पण प्रसंगी आपल्या चुकादेखील सांगायचे. हा प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वा...

छ.शिवराय : स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा आग्रह

Image
      " स्त्री ही मराठ्यांच्या देवघरातील देवता आहे." हे वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे. या वाक्यामागची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्यांनी आपल्या आचरणांनी उदाहरणाने आणि कर्तृत्वाने ही प्रतिष्ठा जपल्याचे आपल्याला लक्षात येते. आपल्या दुर्दैवाने महाराजांची अतिशय मोजकीच पत्रे उपलब्ध होऊ शकली आहेत. त्यातील सर्वात पहिले पत्र सापडले आहे ते म्हणजे २८ जानेवारी १६४६ चे. त्यावेळी महाराजांनी वयाची सोळा वर्षेदेखील पूर्ण केलेली नव्हती. पुणे परगण्यातील रांझेगावच्या बाबाजी भिकाजी गुजर या पाटलाने बदअंमल केला.( म्हणजे व्यभिचार केला.) हे जेव्हा शिवाजी महाराजांना समजले तेव्हा त्यांनी त्याला पकडून आपल्यासमोर हजर केले आणि त्याचे दोन्ही दोन्ही पाय तोडण्याची शिक्षा दिली. महाराजांनी केलेल्या शिक्षेची बातमी सर्वत्र पसरली. त्यानंतर काही काळाने मोसे खोऱ्याचा कुलकर्णी रंगो त्रिमल वाकडे याने देखील बदअंमल केल्याचे उघडकीस आले. आता आपल्यालादेखील अशीच शिक्षा होणार हे लक्षात घेऊन रंगो त्रिमल मोऱ्यांच्या जावळीत पळून गेला. तिथेदेखील त्याला आपल्या जीवाची शाश्वती वाटत नव्हती. एके दिवशी तो भीतीनेच मेला असे...

छ.शिवराय : मानवाच्या प्रतिष्ठेचा आग्रह धरणारा महापुरुष

Image
          छ.शिवाजी महाराजांचे चरित्र हे सदैव प्रेरणादायक आहे.‌ या महामानवाचे नवनवीन पैलू समजतात तसे आपण थक्क होतो. २०२३-२४ हे महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष. यानिमित्ताने मी पुन्हा एकदा महाराजांच्या उत्तुंग आयुष्यावरील व्याख्यानांचे श्रवण केले‌. पुस्तकांचे, लेखांचे वाचन केले. यातून महाराजांचा एक पैलू पुन्हा समजला. तत्कालीन भारतामध्ये माणसांना गुलाम करून विकण्याचे प्रचलन होते. यातून बादशहांना महसूलदेखील मिळे. युरोपियनांना स्वस्त कामगार मिळत. पण अशा या अमानुष व्यापाराला शिवरायांचा विरोध होता.               ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)           युद्धात जिंकलेल्या भूभागातील माणसांना गुलाम करून त्यांना नोकर म्हणून वागवणे अथवा त्यांची खरेदी विक्री करणे हे प्रचलन मोगल, तुर्क पठाण, हबशी या सर्व राज्यकर्त्यांमध्ये बघायला मिळते. तपन रायचौधरी या संशोधकाने स्थानिक साधनांच्या आधारे पुढील माहिती दिली आहे. '१६४५ मध्ये तंजावर,जिंजी आणि मदुराई येथील हिंदू नायक राजांचा विजापूरच्या मुस्लिम सैन्याने पराभव ...

पाश्चात्त्यांचा श्रेष्ठत्वाचा अहंगंड

Image
        " सर्वज्ञ असलेल्या ईश्वराने संपूर्णपणे कृष्णवर्णीय शरीरात आत्मा आणि तोही अमर आत्मा घातला असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. .... हे लोक मनुष्य जातीत मोडतात ही गोष्ट अशक्य आहे." १८ व्या शतकातील फ्रेंच विचारवंत मॉन्टेस्क्यू (१६८९-१७५५) याचे हे अवतरण काही दिवसांपूर्वी वाचनात आले आणि मी सुन्न झालो. माणसाला माणूस म्हणण्याचे नाकारणारे हे विचार दुःखद आणि चीड आणणारे आहेत. मॉन्टेस्क्यू हा अतिश्रीमंत सरंजामदार  युरोपच्या प्रबोधन काळातील फ्रेंच विचारवंत होता. फ्रान्समधील तत्कालीन राजेशाहीच्या बेबंद कारभाराच्या पार्श्वभूमीवर देशाच्या कारभाराबद्दल त्याने महत्वाचे विचार मांडले. विशेषतः कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका हे तीनही स्वतंत्र विभाग असले पाहिजेत. त्यांचा एकमेकांच्या कामात हस्तक्षेप असता काम नये हा महत्त्वाचा विचार त्याने मांडला‌. परंतु फ्रेंचांना कृष्णवर्णीयांना गुलाम करून उसाच्या मळ्यांतून संपत्ती कशी मिळवता येईल याचे समर्थन करताना त्याने वरील निंदनीय विचार मांडले आणि वसाहती करण्यासाठी समर्थन देणारा युक्तिवाद पुरवला. ( जगातील वसाहतींचा नकाशा सौजन्...