आजारपण, माणसांचा सहवास
एक जुने बालगीत आहे. ' पडू आजारी मौज हीच वाटे भारी '. लहान मुलाला वाटते की आजारपण आल्यावर घरातील सगळेजण आपली जास्त काळजी घेतात. हवे नको ते पुरवतात त्यामुळे आजारपणाची गंमत वाटते असा काहीसा त्याचा असे आशय आहे. हे बालगीत एकदम आठवण्याचे कारण असे की काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचली. जपानमध्ये कैकोक्यान (Kaikyokan) येथील मत्स्यालयात एक नवीन मासा (sunfish) आणण्यात आला. मत्स्यालयात पर्यटकांची गर्दी असे. काही कारणांनी मत्स्यालय बंद करण्याचे ठरले. सहाजिकच पर्यटकदेखील येईनासे झाले. त्यामुळे हा मासा काही खाईना, टॅंकच्या काचेला अंग घासू लागला. त्याला बरे नाही असे वाटून त्याला खाणे देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काही उपचार करायला सुरुवात केली. पण तरी देखील त्याचे खाणे काही वाढेना? मग यावर चर्चा झाली. एका कर्मचाऱ्याने असे सुचवले की या माशाला रोज माणसांना बघायची सवय होती. अचानक आता माणसे दिसेनाशी झाल्यामुळे तो मासा अस्वस्थ झाला असेल. अधिकाऱ्यांनीदेखील ही सूचना उडवून न लावता काय करता येईल याची चर्चा केली. त्यातून एक उपाय निघाला तो म्हणजे माणसांचे 'कट आउट' लावाय...