Posts

Showing posts with the label बारीपाडा

पद्मश्री चैत्राम पवार यांची मुलाखत घेण्याचा अनुभव

Image
        "तुम्ही नेहमी मुलाखती घेता का?" ५/१०/२५ यादिवशी एका व्यक्तीने मला विचारले. निमित्त होते जनजाती कल्याण आश्रम पुणे महानगर यांच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या दिनदर्शिकेचे. २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री चैत्रामजी पवार यांच्या हस्ते स.प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहामध्ये नुकतेच झाले. यावेळी त्यांची मुलाखत मी घेतली.मी घेतलेली ही तिसरी मुलाखत. ही मुलाखत संपल्यानंतर श्रोत्यांपैकी एका व्यक्तीने मला हा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचा मला आनंद झाला. साधारणपणे भाषणे करणाऱ्या माणसाला मुलाखत घ्यायला सांगितले म्हणजे मुलाखत घेणारा जास्त बोलेल अशी शक्यता असते. परंतु कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते श्री. विनायक खाडे यांनी आग्रहपूर्वक हे काम मला सांगितले. कार्यक्रमानंतर बऱ्याच जणांनी मुलाखत घेण्याची पद्धत आवडल्याचे आवर्जून सांगितले. त्यावरून मी श्री खाडे यांना अडचणीत आणले नाही असे म्हणता येईल.       या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वैयक्तिक संस्मरणीय योग आला. सन १९८८ ते १९९० अशी दोन वर्षे मी इयत्ता अकरावी ब...

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

काही दिवस अतिशय आनंद देऊन जातात. त्यातलाच एक आजचा दिवस! बारीपाडा , जिल्हा धुळे येथील रहिवासी असलेले श्री. चैत्रामभाऊ पवार यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. आज ते पुण्यामध्ये आले होते. हे निमित्त साधून आमच्या म.ए‌.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चैत्रामभाऊंची भेट झाली. त्यामुळे आजच्या दिवशी अतिशय आनंद झाला. ( आजचे छायाचित्र मध्यभागी श्री. चैत्रामभाऊ पवार, डावीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे मा. सदस्य श्री रवींद्र शिंगणापूरकर, चैत्रामभाऊंच्या उजवीकडे माझ्या पूर्वी धुळे जिल्ह्यात वनवासी कल्याण आश्रमाचे काम करणारे आमच्या महाविद्यालयातील श्री विनायक खाडे यांच्या शेजारी चैत्रामभाऊंचे सहकारी डॉ. सूर्यवंशी) १९९९ ते २००१ ही दोन वर्षे मी धुळे जिल्ह्यात संघाचा प्रचारक म्हणून काम करीत होतो. त्यावेळी वेगवेगळ्या निमित्ताने बारीपाड्याला काही वेळा जाणे झाले. त्यानिमित्ताने सुरुवातीला चैत्रामभाऊंची ओळख झाली आणि परिचय वाढला. तेव्हापासूनच त्यांच्या कामाची माहिती मला होती. दुर्गम डोंगरामध्ये वसलेले बारी...