Posts

Showing posts with the label राजर्षी शाहू महाराज

जीविका आणि उपजीविका

Image
         एखादी व्यक्ती आपल्या उदरनिर्वाहासाठी जे काम करते त्याला उपजीविका असे म्हणण्याची पद्धत आहे.  एकदा एकाने प्रश्न विचारला की , "ज्यावर आपला चरितार्थ चालतो त्याला त्या कामाला उपजीविका असे म्हटले जाते. तर जीविका कशाला म्हणायचे?" त्यावेळी एका जाणकाराने त्याला उत्तर दिले. उत्तरादाखल त्यांनी एक गोष्ट सांगितली. परीसाच्या शोधात भटकणाऱ्या एका माणसाची गोष्ट प्रसिद्ध आहे. एका सागर किनाऱ्यावर परिसाचा दगड सापडतो असे त्या माणसाला समजले म्हणून त्या माणसाने परिसाचा शोध घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने आपल्या गळ्यात एक लोखंडी साखळी घातली. तो समुद्रकिनाऱ्यावर चालू लागला. किनाऱ्यावरील दगड घ्यायचा त्या दगडाने गळ्यातील साखळीला स्पर्श करायचा. जर साखळी सोन्याची झाली तर तो दगड परीस आहे असे सिद्ध होईल. त्या माणसाने या प्रकारे प्रत्येक दगड उचलून साखळीला लावायला सुरुवात केली. किनाऱ्यावरती मोजता येणार नाहीत इतके भरपूर दगड होते.  किनारा खूप लांबलचक होता. त्यामुळे हळूहळू त्या माणसाला हे काम दीर्घकाळ करावे लागेल याचा अंदाज आला. माणसाचा एक स्वभाव आहे. माणसाच्या अंगवळणी एखादी गोष...

संवादातील सहजपणा

Image
     माणसाचा अभिमान ही तशी स्वाभाविक म्हणावी अशी गोष्ट आहे. याचे कारण प्रत्येक माणूस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. एका अर्थाने प्रत्येक जण हा 'एकमेवाद्वितीय' असतो. यामुळेच की काय स्वतःच्या दिसण्याचा, ज्ञानाचा, संपत्तीचा, पदाचा, सत्तेचा अभिमान माणसांमध्ये सहजपणे तयार होतो.  हा तयार झालेला अभिमान कळत नकळत अहंकारामध्ये रूपांतरित होतो. जवळ असलेल्या गुणवैशिष्ट्यांमुळे इतरांच्यापेक्षा आपण कोणीतरी खूप वेगळे आहोत अशी भावना माणसांच्या मनात निर्माण होते आणि त्यातून स्वतःच्या वरचढपणाचा अहंकार तयार होतो. असा वरचढपणा अंगात भिनला की मग काहीजणांना सर्वांशी बरोबरीच्या भूमिकेतून संवाद करणे शक्य होत नाही. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे संवाद ऐकू येतात. या संवादातून बहुदा बरेच जळ स्वतःचा वेगळेपणा ठसवत असतात किंवा ठसवण्याचा प्रयत्न करत असतो.     ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )      याला अपवाद असणारी मोठी माणसे आपला मोठेपणा सहजपणे विसरून इतरांच्यामध्ये मिसळून जातात. काही वर्षांपूर्वी एआरडीइ या संरक्षण खात्याच्या संशोधन संस्थेतून संचालक म्हणून निवृत्त झालेले ...

गुणग्राहक राजर्षी शाहू महाराज

Image
राजर्षी शाहू महाराज हे बहुमुखी प्रतिभेचे धनी होते. सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेली अजोड कामगिरी तर सर्वांना माहिती आहेच. असे हे शाहू महाराज हे कलाकारांची माणसांची कदर करणारे होते. आपल्या माणसांना ते सर्व प्रकारचे सहाय्य करत असे. शाहू महाराज हे नाटकांचे चाहते होते. प्रसिद्ध नाटककार गोविंदराव टेंबे यांना एका नाटकासाठी मोर्चेल वगैरे साहित्याची आवश्यकता होती.त्यांनी महाराजांची भेट घेतली. महाराजांच्या कानावर अडचण घातली. महाराजांनी विचारलं हे साहित्य कुठे मिळेल? टेंबे म्हणाले , "महाराज आपल्या वाड्यातच". महाराजांनी सांगितले की, " जा काळजी करू नकोस". प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळेला महाराजांनी राजवाड्यातील साहित्य पोच केले. स्वतः देखील प्रयोग पाहण्यासाठी उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक केले.                                                                       ( गोविंदराव टेंबे ) महार...