Posts

Showing posts with the label पीटर मुंडी

छ.शिवराय : शेती व महसूलविषयक धोरण

Image
       " महसूल न्यून होणे ही राज्याची सीर्णता. तो राज्यलक्ष्मीचा पराभव" असे वाक्य ऐतिहासिक साधनात वाचायला मिळते. त्यामुळे मध्ययुगात शेतीपासून जास्तीत जास्त महसूल मिळवणे हेच राज्यकर्त्यांचे धोरण असे.  ( लाल महालातील शिल्प इंटरनेटवरून साभार )          शिवाजी महाराजांचे धोरण पाहण्यापूर्वी तत्कालीन अन्य राज्यकर्ते मोगल, आदिलशाह निजामशाह, कुतुबशाह यांचे धोरण पाहिले पाहिजे. या सर्वांच्या राज्यांमध्ये शेतीवर ६० % कर आकारणी होत असे. त्यामुळे लागवडीचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत खाली घसरले होते. तसेच जे शेतकरी सारा देऊ शकत नसत अशांवर पाशवी अत्याचार होत असत. त्यांची मुंडकी तोडून त्यांचे मिनार रचले जात असत. शिर नसलेली धडे झाडांना टांगली जात. पीटर मुंडी या इंग्लिश प्रवाशाने पाटणा ते आग्रा या प्रवासात जे मुंडक्यांचे मिनार पाहिले त्यातील मुंडक्यांची मोजदाद करून आठ हजार मुंडकी पाहिल्याचे लिहून ठेवले आहे. मुघलांचा मनसबदार अब्दुल्ला फिरोजजंग बहादूर याने १६३२ मध्ये स्वतःच लिहून ठेवले आहे की मी दोन लाख शेतकऱ्यांना ठार मारले आहे. औरंगजेबाने गुजरातचा सुभेदार १६...