Posts

Showing posts with the label गाडगे महाराज

कर्म हीच पूजा

Image
  "गोपाला गोपाला! देवकीनंदन गोपाला!" संत गाडगे महाराजांचे कीर्तन कोकणातल्या एका गावात रंगात आले होते. गाडगे बाबा नेहमीप्रमाणे समाजप्रबोधन करीत होते. तेवढ्यात पुण्याहून आलेली तार घेऊन एक जण धावत धावत गाडगेबाबांच्याकडे आला. त्याचा चेहरा उतरला होता. चेहऱ्यावरती दुःख स्पष्ट दिसत होते. बाबांनी विचारले "काय लिहिले आहेत तारेत?". " बाबा तुमचा मुलगा कुत्रा चावल्याचे निमित्त होऊन पुण्यामध्ये मरण पावला." तारेतला मजकूर बाबांना संगीत लागेल. आता बाबा काय करणार सर्व जण पाहू लागले. बाबा म्हणाले," असे गेले कोट्यानुकोटी, तेथे काय रडू एकट्यासाठी" बाबांचे कीर्तन तसेच पुढे चालू राहिले. आपल्या देशात कर्म हाच ईश्वर ही समजूत पूर्वापार चालत आली आहे. मध्ययुगीन संतांच्या अभंगातला देखील हा उल्लेख आपल्याला ठीकठिकाणी आढळतो. उदाहरणार्थ श्रेष्ठ संत सावता माळी यांच्या अभंगात "कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी" असे आपल्याला वाचायला मिळते. इंग्रजीमध्ये "शो मस्ट गो ऑन " असे म्हटले जाते. संकल्पनेत थोडा फरक असला तरी कार्यरत राहणे याला महत्त्व दिल्याचे आपल्या लक्षात...