रवींद्रनाथ : विद्यार्थ्यांकडे कोणते गुण असावेत
२०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष जवळपास ऑनलाइन अभ्यास करण्यातच गेले. फार थोडा काळ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येऊन शिकता आलं. परंतु समाज म्हणून आपण नाइलाजाने या सर्व परिस्थितीला सामोरे गेलो आहोत. अजून किती काळ ही परिस्थिती राहील ह्याबाबत अनिश्चितता आहे. पण आपण सर्वजण धीराने, निश्चयाने यापुढेही काम करत राहूया. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) माणसासाठी शिक्षण ही कायमच महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी शिकणं आणि शिकवणं हे नेहमी चालू ठेवणं आवश्यक आहे. यासाठी भारतातल्या अनेक महान व्यक्तिंनी शिक्षणाबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. या व्यक्तिंपैकी एक महत्वाचे नाव म्हणजे रवींद्रनाथ ठाकूर होय. भारतातील नव्हे तर आशिया खंडातील पहिले नोबेेल पारितोषिक विजेते म्हणून ते आपल्याला माहिती आहेत. रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंपैकी शिक्षणतज्ञ हा एक पैलू आहे. विद्यार्थ्यांकडे कोणते गुण असावेत याबाबत त्यांनी अनेक मुद्दे सांगितले आहे. त्यापैकी आपण काही मुद्दे पाहूया. रवींद्रनाथांनी निसर्गाला "...